JOIN US
मराठी बातम्या / देश / VIDEO| खिडकीतून जीव वाचवण्यासाठी धडपड, लखनऊच्या हॉटेलमध्ये भीषण आग

VIDEO| खिडकीतून जीव वाचवण्यासाठी धडपड, लखनऊच्या हॉटेलमध्ये भीषण आग

अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तर आतमध्ये अडकलेल्या लोकांना रेस्क्यू करणं सुरू आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

लखनऊ : पाच दिवसांच्या गणपतीचं विसर्जन आज होणार आहे. त्याआधी लखनऊमध्ये भीषण दुर्घटना घडली आहे. लखनऊच्या हॉटेलमध्ये मोठा अग्नितांडव पाहायला मिळाला. हॉटेलमध्ये आगीचा भडका उडाला यामुळे तिथे गोंधळाचं वातावरण होतं. लोक आपला जीव वाचवण्यासाठी खिडकीतून बाहेर पडण्यासाठी धडपडत होते. उत्तर प्रदेशातील लखनऊमधील हजरतगंज इथल्या हॉटेलमध्ये भीषण आग लागली. याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाडा घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तर आतमध्ये अडकलेल्या लोकांना रेस्क्यू करणं सुरू आहे. हेही वाचा- 3 सेकंदात 50 फुटावरुन खाली कोसळलं स्काय स्विंग; लोक जमिनीवर आदळून उडाले, धक्कादायक VIDEO

संबंधित बातम्या

जाहिरात

हेही वाचा- 9 मिनिटांत 20 KM अंतर केलं पार; सीटबेल्टही नाही, ‘ही’ ठरली सायरस मिस्त्रींच्या अपघाताची कारणं? ही आग कशामुळे लागली याची कोणतीही माहिती अजून समोर आली नाही. लोक जीव वाचवण्यासाठी खिडकीतून उतरत आहेत. अग्निशमन दलाचे जवान या लोकांना रेस्क्यू करत आहेत. हॉटेलमध्ये अनेकजण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या