JOIN US
मराठी बातम्या / देश / मंडपातील पाहुणे थेट रुग्णालयात पोहोचले..! फोटोशूटवरुन वाद अन् लग्नातच तुफान हाणामारी

मंडपातील पाहुणे थेट रुग्णालयात पोहोचले..! फोटोशूटवरुन वाद अन् लग्नातच तुफान हाणामारी

फोटो काढण्यासाठी वधू आणि वराकडील लोकांमध्ये असा वाद झाला की घटनास्थळी खुर्च्याही फेकल्या गेल्या. यासोबत लाथाबुक्क्यांनी मारहाणही झाली. हे सर्व पाहून वऱ्हाडी मंडप सोडून पळून गेले.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

लखनऊ 12 डिसेंबर : देशात आणि जगात दररोज शेकडो लग्नं होत असली तरी काही लग्नं चर्चेत येतात. याचं कारण एकतर त्यात घडणारी गंमत किंवा तुम्ही कधी कल्पनाही केलेली नसेल अशी काहीतरी गोष्ट असते. मात्र, यावेळी समोर आलेल्या घटनेनं इंटरनेटवरच खळबळ उडाली आहे. लग्नाच्या मिरवणुकीतील डान्स, वधूची धमाकेदार एंट्री तुम्ही पाहिली असेलच, पण या लग्नात निर्माण झालेला प्रसंग तुम्ही कधीही पाहिला किंवा ऐकला नसेल. VIDEO - भरमंडपातच त्याने मित्राला…; लग्नात नवरदेवाचं असं रूप पाहून नवरीबाईही स्तब्ध झाली ही घटना उत्तर प्रदेशातील सीतामढी येथील आहे, जिथे वरमाळेच्या कार्यक्रमा दरम्यान फोटो काढण्यासाठी वधू आणि वराकडील लोकांमध्ये असा वाद झाला की घटनास्थळी खुर्च्याही फेकल्या गेल्या. यासोबत लाथाबुक्क्यांनी मारहाणही झाली. हे सर्व पाहून वऱ्हाडी मंडप सोडून पळून गेले. तुम्हाला हे ऐकून विचित्र वाटलं असेल, पण हे खरं आहे की, जिथे लोक लग्नात सहभागी होण्यासाठी आले होते, तिथे काही लोकांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं. लग्नही तुटण्याच्या मार्गावर असल्यानं पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. मिळालेल्या माहितीनुसार, फोटो काढण्यावरून हा संपूर्ण वाद वरमाळेच्या कार्यक्रमा दरम्यान झाला. नवरदेवाकडील लोक आणि काही स्थानिक तरुणांमध्ये हा वाद झाला आणि तो हाणामारीपर्यंत पोहोचला. या भांडणाचा व्हिडिओही समोर आला आहे, ज्यामध्ये दोन्ही पक्ष एकमेकांवर खुर्च्या फेकताना दिसत आहेत. हा सर्व प्रकार पाहिल्यानंतर वराने मंडपातून पळ काढला आणि लग्नास नकार दिला. हे प्रकरण सीतामढीच्या भासर मच्छा गावातील आहे. वराच्या बाजूने हे प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचलं आणि पोलिसांनी हस्तक्षेप केला. लग्नाच्या मंडपात गेली पण नवरदेवाचा चेहरा पाहताच भडकली नवरी, स्टेजवरच अशी घडवली अद्दल, VIDEO लग्नसमारंभात आधी फोटो कोणाचा काढायचा यावरुन हा वाद झाल्याचं सांगितलं जात आहे. हेच या प्रकरणाचं मुख्य कारण होतं. गोंधळ इतका वाढला की काही लोक जखमी झाले आणि त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागले. या भांडणानंतर लग्नही रद्द करण्यात आलं, मात्र पोलिसांच्या मध्यस्थीनंतर वराने आपला निर्णय बदलून लग्नाला होकार दिला. हे अजब प्रकरण सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या