भरतपूर, 28 जानेवारी : राजस्थानमधील भरतपूरमध्ये भारतीय लष्काराच्या फायटर जेटचा मोठा अपघात झाला आहे. हे विमान भरतपूरच्या सावेर पोलीस स्टेशन हद्दीतील नागला विसा परिसरात कोसळले. आज सकाळी हा अपघात झाला आहे. या विमानामध्ये किती जण बसले होते याबाबतची अद्याप कोणतीही माहिती मिळू शकलेली नाहीये. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, बचाव कार्य सुरू आहे. भारतीय वायुसेनेला देखील या फायटर जेटच्या अपघाताची माहिती देण्यात आली आहे. या विमानाचा अपघात नेमका कसा झाला? याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. …तर घडली असती मोठी दुर्घटना हे विमान राजस्थानच्या भरतपूरमधील नागला विसा गावाच्या परिसरात कोसळले. हे फायटर जेट मोकळ्या जागेत कोसळल्यानं सुदैवानं मोठा अपघात टळला आहे. जर हे विमान गावावर कोसळले असते तर मोठा अपघात झाला असता. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनाचे अधिकारी तसेच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. हा अपघात झाल्यानंतर घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली असून, पोलिसांकडून गर्दी न करण्याचं आव्हान करण्यात आलं आहे.
मुरैनाजवळ आणखी दोन विमानांचा अपघात दरम्यान दुसरीकडे मध्य प्रदेशमधील मुरैनाजवळ एक सुखोई-30 आणि मिराज 2000 विमान दुर्घटनाग्रस्त झाले आहेत. एकाचवेळी 3 फायटर जेट विमानं कोसळल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी बचाव कार्याला सुरुवात झाली आहे.