JOIN US
मराठी बातम्या / देश / सरकार Vs. ट्विटर वाद चिघळणार, Twitter विरोधात पाचवा गुन्हा दाखल, देवीचा अपमान केल्याची तक्रार

सरकार Vs. ट्विटर वाद चिघळणार, Twitter विरोधात पाचवा गुन्हा दाखल, देवीचा अपमान केल्याची तक्रार

हिंदूची देवता कालीमातेचा अपमान केल्याप्रकरणी ट्विटरविरोधात तक्रार नोंद झाली आहे. एका वकिलांनी ट्विटरवरील एका पोस्टला आक्षेप घेत देवीचं चित्र छापलेल्या टीशर्टना आक्षेप घेत सायबर पोलिसांत तक्रार नोंदवली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 4 जुलै: मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटरविरोधात (Twitter) आणखी एक गुन्हा (Complaint) दाखल करण्यात आला आहे. हिंदूची देवता (Hindu Goddess) कालीमातेचा अपमान केल्याप्रकरणी ट्विटरविरोधात तक्रार नोंद झाली आहे. एका वकिलांनी (A lawyer) ट्विटरवरील एका पोस्टला आक्षेप घेत देवीचं चित्र छापलेल्या टीशर्टना आक्षेप घेत सायबर पोलिसांत तक्रार नोंदवली आहे. या प्रकऱणी ट्विटरचे व्यवस्थापक मनिष माहेश्वरी (Manish Maheshwari) आणि एथिस्ट रिपब्लिक (Atheist Repblic) या ट्विटर हँडलवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आतापर्यंत 5 गुन्हे ट्विटरवर वेगवेगळ्या प्रकरणात आतापर्यंत 5 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ट्विटरने लिगल शिल्ड गमावल्यापासून थेट ट्विटरवर हे गुन्हे दाखल होत आहेत. यामध्ये

  1. गाझियाबाद पोलिसांनी एका मुस्लिम समुदायाच्या ज्येष्ठ नागरिकाला मारहाण केल्याचा व्हिडिओ अपलोड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला
  2. ट्विटरवर भारताचा चुकीचा झेंडा दाखवल्याप्रकरणी बुलंदशहरमध्ये गुन्हा दाखल झाला
  3. याच कारणासाठी मध्यप्रदेशच्या सायबर सेलमध्येही गुन्हा दाखल झाला
  4. चाईल पोर्नोग्राफिक कंटेंटबाबतही गुन्हा दाखल झाला
  5. हिंदू देवीचा अपमान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला

ट्विटरकडे कायद्याचं कवच नाही एखाद्या साईटवर जो तपशील प्रकाशित होतो, त्याबाबत थेट त्या वेबसाईटवर गुन्हा दाखल होत नाही. त्यासाठी एक लिगल शिल्ड देण्यात आलेलं असतं. मात्र ट्विटरनं भारतातील नव्या आयटी कायद्यांची पूर्तताच केली नसल्यामुळे आणि वारंवार नोटिसा देऊनही ट्विटर प्रतिसाद देत नसल्यामुळे केंद्र सरकारनं हे लीगल शिल्ड काढून घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे आता ट्विटरविरोधात होणारी कुठलीही तक्रार ही थेट कंपनीविरोधात होते आणि कंपनीच्या पदावरील अधिकाऱ्यांना त्यासाठी जबाबदार धरण्यात येतं. हे वाचा - बंगालच्या मुख्यमंत्र्यांवर सोनियांची ‘ममता’, बड्या नेत्याचा पत्ता कट? केंद्र सरकार विरुद्ध ट्विटर केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांचं अकाऊंट ट्विटरनं 25 जूनला ब्लॉक केलं होतं. कॉपीराईटच्या कारणावरून ही कारवाई केल्याचं सांगत एका तासाने हे खातं पूर्ववत सुरू करण्यात आलं. त्यानंतर ट्विटर आणि सरकारमधील संघर्ष अधिकच विकोपाला गेल्याचं चित्र देशात दिसत आहे. ट्विटरने सध्या नव्या कायद्यांची पूर्तता करण्यासाठी पुरेसा वेळ देण्याची मागणी केली असून आपला त्याला विरोध नसल्याचंही स्पष्ट केलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या