JOIN US
मराठी बातम्या / देश / Farmer Protest : 2024 पर्यंत सुरू राहणार शेतकऱ्यांचं आंदोलन? 'ते' म्हणतात ही वैचारिक क्रांती

Farmer Protest : 2024 पर्यंत सुरू राहणार शेतकऱ्यांचं आंदोलन? 'ते' म्हणतात ही वैचारिक क्रांती

देशातील पुढील लोकसभा निवडणुका एप्रिल ते मे 2024 च्या आसपास होणार आहेत. तोपर्यंत आंदोलन सुरू राहिल, असा इशारा देण्यात आला आहे

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नागपुर, 17 जानेवारी : भारतीय शेतकरी यूनियन (Indian Farmers Union) (भाकियू) नेता राकेश टिकैतने (Rakesh Tikait) रविवारी सांगितलं की, शेतकरी नवीन कृषी कायद्याविरोधात (Farm Laws 2020) मे 2024 पर्यंत आंदोलन करण्यासाठी तयार आहेत आणि दिल्लीतील सीमेवर (Delhi border Farmer Protest) सुरू असलेले शेतकऱ्यांचं आंदोलन वैचारिक क्रांती असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. नागपुरात एका संमेलनाला संबोधित करताना टिकैत म्हणाले की, त्यांना MSP वर कायदेशीर गॅरेंटी हवी आहे. कृषी कायद्याविरोधात 26 नोव्हेंबर 2020 पासून दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत आहेत. नवीन तीन नवीन कायदे मागे घ्यावेत, अशी त्यांची मागणी आहे. या कायद्यामुळे कृषी क्षेत्रात मोठी प्रगती होईल, असं केंद्राकडून सांगितलं जात असलं तरी शेतकऱ्यांचा त्याला विरोध आहे. नवीन कायद्यांमुळे एमएसपीची सुरक्षा संपून APMC यंत्रणा बंद करण्याचा मार्ग मोकळा होईल, अशी भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. हे ही वाचा- अखेर सरकारला आली जाग; कोरोनासंदर्भातील ‘तो’ निर्णय घेतला मागे सर्वोच्च न्यायालयाने कायद्याच्या अंमलबजावणीवर घातली बंदी पुढील आदेश येईपर्यंत सर्वोच्च न्यायालयाने गेल्या मंगळवारी नवीन कृषी कायद्यांच्या अंमलबजावणीवर स्थगिती दिली आहे. शेतकरी किती काळ आंदोलन करणार याबाबत टिकैत यांना विचारलं असता ते म्हणाले की, आम्ही 2024 मे पर्यंत आंदोलन सुरू ठेवण्यास तयार आहोत. आमची मागणी आहे की हे तीनही कायदे मागे घ्यावेत आणि सरकारने एमएसपीला कायदेशीर हमी द्यावी. हे लक्षात घेण्यासारखे आहे की देशातील पुढील लोकसभा निवडणुका एप्रिल ते मे 2024 च्या आसपास होणार आहेत. या निदर्शनाला श्रीमंत शेतकऱ्यांनी मदत केल्याचा आरोपही त्यांनी यावेळी फेटाळून लावला आहे. आंदोलन जास्त काळ चालेल. टिकैत म्हणाले की, बिले मागे न घेण्याच्या भूमिकेवर सरकार ठाम आहे आणि हे आंदोलन बर्‍याच काळासाठी पुढे जाऊ शकते. पुढे टिकैत म्हणाले, “कोर्टाने स्थापन केलेल्या समितीसमोर आम्हाला जायचे नाही. सरकार आणि शेतकरी या मुद्दयावर तोडगा काढतील असेही सरकारने म्हटले आहे. "

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या