नवी दिल्ली, 7 मार्च : Punjab assembly elections 2022 : पंजाब विधानसभा निवडणुकीचे Exit Polls समोर आले आहे. यानुसार यंदा पंजाबचा मुख्यमंत्री आम आदमी पक्षाचा असल्याचं Exit Polls मधून समोर आलं आहे. यंदा पंजाब विधानसभा निवडणुकीत काटेकी टक्कर पाहायला मिळाली. मात्र पंजाबच्या एग्झिट पोलबद्दल बोलायचं झाल्यास, गेल्या विधानसभा निवडणुकीत हे पोल्स चुकीचे सिद्ध झाले होते आणि पंजाबमध्ये काँग्रेसची सरकार स्थापन झाली होती. यंदाच्या एग्झिट पोलमध्ये काँग्रेस आणि आपमध्ये काटेकी टक्कर असल्याचं सांगितलं जात आहे. आणि काही पोल्समध्ये आप सरकार येण्याचं सांगितलं जात आहे. जाणून घ्या गेल्या विधानसभा निवडणुकीत विविध न्यूज चॅनल आणि सर्वे एजन्सीचे Exit Polls मध्ये काय सांगण्यात आलं होतं. 2017 मध्ये पंजाब विधानसभा निवडणुकीनंतर आलेल्या Exit Polls मध्ये काँग्रेस पक्ष आणि आपमध्ये काटे की टक्कर असल्याचं सांगितलं होतं. मात्र निवडणुकीचे निकाल त्याहून उलट होते आणि काँग्रेस सरकार स्थापन केली होती. काही एग्जिट पोलमध्येतर आप पुढे असल्याचं सांगितलं होतं.
C वोटरच्या सर्व्हेमध्ये AAP ला 63 जागांसह बहुमत मिळणार असल्याचं सांगितलं होतं. तर टुडेज चाणक्य पोलमध्ये काँग्रेस आणि आपमध्ये काटेकी टक्कर असल्याचं दिसत होतं. एक्सिसच्या सर्व्हेमध्येही पंजाबमध्ये आम आदमी पार्टीची सरकार येणार असल्याचं सांगितलं होतं. तर ABP न्यूजच्या सर्व्हेमध्ये काँग्रेसची सरकार स्थापन होणार असल्याचं सांगितलं होतं.
हे ही वाचा-
Exit Polls : जनतेवर भगवंत सिंग मानची जादू; पंजाबमध्ये ‘आप’चं सरकार
इंडिया टूडेच्या पोल्सनुसार, काँग्रेसला गेल्या निवडणुकीच्या तुलनेत 10 टक्क्यांनी मतदान कमी झालं असून यंदा 19 टक्के मतदान झालं आहे. तर भाजपला 7 टक्के मतदान झालं आहे. अकाली दलाला 19 टक्के मतदान झालं आहे. तर आम आदमी पक्षाला तब्बल 41 टक्के मतदान झाल्याचं सांगण्यात आलं आहे. तर अन्यला 5 टक्के मतदान झालं आहे.
त्यांची पोल्स साइज 28,582 इतकी असल्याचं सांगण्यात आलं आहे. इंडिया टुडेच्या पोल्सनुसार, आम आदमी पक्षाला सर्वाधिक मतदान झालं आहे. पंजाबध्ये 117 विधानसभेसाठी निवडणूक झाल्या असून विजयासाठी 59 जागा आवश्यक आहे. एक्झिट पोल्सविषयी अधिक माहिती शेअरचॅटच्या
या लिंक
वर क्लिक करून मिळेल.