JOIN US
मराठी बातम्या / देश / Exit Polls : जनतेवर भगवंत सिंग मानची जादू; पंजाबमध्ये 'आप'चं सरकार

Exit Polls : जनतेवर भगवंत सिंग मानची जादू; पंजाबमध्ये 'आप'चं सरकार

पंजाबमध्ये गेल्या वेळेस 77 टक्के मतदान झालं होतं. मात्र यंदा 72 टक्के मतदान झालं आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 7 मार्च : पंजाबच्या विधानसभा निवडणुकीचे विविध संस्थांचे Exit Polls समोर आले आहेत. यानुसार यंदा पंजाबमध्ये आपने सर्वांना झाडून काढल्याचं आकड्यांवरुन दिसून येत आहे. आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल (AAP National Convener Arvind Kejriwal) यांनी पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाचा चेहरा आधीच घोषित केला होता. भगवंत सिंग मान (Bhagwant Singh Mann) यांचं नाव पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाचा  (Punjab Assembly Elections 2022) चेहरा घोषित करण्यात आलं होतं. त्यानुसार पंजाबमध्ये भगवंत मान यांची जादू चालत असल्याचं दिसून येत आहे. इंडिया टूडेच्या पोल्सनुसार, काँग्रेसला गेल्या निवडणुकीच्या तुलनेत 10 टक्क्यांनी मतदान कमी झालं असून यंदा 19 टक्के मतदान झालं आहे. तर भाजपला 7 टक्के मतदान झालं आहे. अकाली दलाला 19 टक्के मतदान झालं आहे. तर आम आदमी पक्षाला तब्बल 41 टक्के मतदान झाल्याचं सांगण्यात आलं आहे. तर अन्यला 5 टक्के मतदान झालं आहे. त्यांची पोल्स साइज 28,582 इतकी असल्याचं सांगण्यात आलं आहे. इंडिया टुडेच्या पोल्सनुसार, आम आदमी पक्षाला सर्वाधिक मतदान झालं आहे. पंजाबध्ये 117 विधानसभेसाठी निवडणूक झाल्या असून विजयासाठी 59 जागा आवश्यक आहे. काँग्रेस - 19-31 (जागा येण्याची शक्यता) अकाली दल - 7-11 आप - 76-90 AXIS-My India च्या Exit Polls नुसार… काँग्रेस - 19-31 आप - 79-90 अकाली दल - 11+ ETG Research च्या Exit Polls नुसार… काँग्रेस - 27-23 आप - 70-75 अकाली दल - 7-13 पंजाबमध्ये किती झालं मतदान? पंजाबमध्ये 20 फेब्रुवारी रोजी सर्व 117 विधानसभा जागांवर मतदान झालं. आता तरी सर्वांचं लक्ष 10 मार्च रोजी येणाऱ्या निकालांवर आहे. पंजाबमध्ये गेल्या वेळेस 77 टक्के मतदान झालं होतं. मात्र यंदा 72 टक्के मतदान झालं आहे. सर्वाधिक जास्त मतदान यंदा मालवा भागात झालं आहे. मालवा हा आम आदमी पक्षाचा गड मानला जात आहे. तलवंडी साबो विधानसभेत सर्वाधिक 83.67 टक्के मतदान झालं, तर अमृतसर पश्चिम जागांवर सर्वात कमी 50.10 टक्के मतदान झालं. मनसामध्ये  73.45%, मलेरकोटलामध्ये 72.84%, पतियाळात 62.10%, पूर्व अमृतसरमध्ये 59.77%, जलालाबादमध्ये 80.10%, लांबीत 72%, धुरीमध्ये 78.89%, भदौडमध्ये 70% मतदान झालं. एक्झिट पोल्सविषयी अधिक माहिती शेअरचॅटच्या या लिंक वर क्लिक करून मिळेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या