JOIN US
मराठी बातम्या / देश / नुपूर शर्माची जीभ छाटण्यासाठी 1 कोटींचं बक्षीस जाहीर करणाऱ्याला अटक

नुपूर शर्माची जीभ छाटण्यासाठी 1 कोटींचं बक्षीस जाहीर करणाऱ्याला अटक

पैगंबर मोहम्मद यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या भाजपाच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांना धमकी देण्याच्या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 17 जून : पैगंबर मोहम्मद यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या भाजपाच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांना धमकी देण्याच्या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलनं भीम सेना प्रमुख नवाब सतपाल कंवर याला अटक केली आहे. नुपूर शर्माची जीभ कापणाऱ्याला एक कोटींचे बक्षीस सतपालने जाहीर केले होते. त्याला हिंसेचे आवाहान करणे आणि धमकावण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलीय. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या युनिटनं सतपाल तंवरला गुरग्राममधील त्याच्या घरी अटक केली आहे. भारतीय जनता पक्षाच्या  युवा मोर्चाचे अध्यक्ष सर्वप्रीया त्यागी यांनी या प्रकरणात सतपाल तंवर यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. सतपालच्या विरोधात कलम 506 (गुन्हेगारी स्वरूपाची धमकी), 509 ( एका महिलेचा अपमान) आणि 153 ए (वेगवेगळ्या समुहातील शत्रुत्वाला चालना देणे) या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती सायबर पोलिसांनी दिली आहे. नूपुर शर्मा यांच्या वादग्रस्त विधानामुळे एकच खळबळ उडाली आहे. देशभरात नुपूर शर्मा आणि नवीन जिंदल यांच्या अटकेची मागणी होत आहे. मुंबईमध्ये रजा अकादमीने नुपूर शर्मांच्या विरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर मुंबई पोलिसांनी नूपुर शर्मांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे काश्मीरी पंडितांबाबतचं ‘ते’ वक्तव्य साई पल्लवीला भोवलं;अभिनेत्रीविरोधात पोलिसांत तक्रार दाखल काय आहे प्रकरण? भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी एका टीव्ही डिबेटमध्ये पैगंबर मोहम्मद यांच्यावर वादग्रस्त टिप्पणी केली होती. यानंतर वाद अधिकच वाढला. नुपूर शर्मा यांच्या वक्तव्याचा अरब देशांनीही निषेध केला होता. यानंतर भाजपने नुपूर शर्मा यांना पक्षातून निलंबित केले. वाद वाढल्यानंतर नुपूर शर्माने माफीही मागितली होती आणि आपले वक्तव्य मागे घेतले होते. त्या म्हणाल्या होत्या की, मी माझे शब्द मागे घेते. कोणाला दुखावण्याचा माझा हेतू नव्हता, माझ्या बोलण्याने कोणाच्या धार्मिक भावना दुखावल्या असतील तर मी माझे शब्द मागे घेते.’ असं त्यांनी जाहीर केलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या