JOIN US
मराठी बातम्या / देश / Republic Day Violence: मोठ्या कारवाईच्या तयारीत गृह मंत्रालय, शेतकरी संघटनांशी होणार महत्त्वपूर्ण बैठक

Republic Day Violence: मोठ्या कारवाईच्या तयारीत गृह मंत्रालय, शेतकरी संघटनांशी होणार महत्त्वपूर्ण बैठक

दिल्लीच्या (Delhi) रस्त्यांवर प्रजासत्ताक दिनी (Republic Day) झालेल्या हिंसाचाराची गंभीर दखल केंद्रीय गृहमंत्रालयानं (Union Home Ministry) घेतली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली :  दिल्लीच्या (Delhi) रस्त्यांवर प्रजासत्ताक दिनी (Republic Day) झालेल्या हिंसाचाराची गंभीर दखल केंद्रीय गृहमंत्रालयानं (Union Home Ministry) घेतली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. गृह मंत्रालयानं दिल्ली पोलिसांसह (Delhi Police) सर्व शेजारच्या राज्यातील पोलिसांना गोंधळ घालणाऱ्या व्यक्तींच्या विरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याचबरोबर 26 जानेवारी रोजी झालेल्या हिंसाचाराची चौकशी दिल्ली पोलिसांची क्राईम ब्रँच करणार आहे. या संपूर्ण प्रकरणात क्राईम ब्रँच SIT ची स्थापना करणार असून त्याच्यामार्फत या प्रकरणाची चौकशी होईल. त्याचबरोबर आज (बुधवार) संध्याकाळपर्यंत दिल्ली आणि एनसीआर (Delhi-NCR) परिसरातील सर्व आंदोलनाच्या जागा रिकाम्या करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या निर्देशांचं पालन न करणाऱ्या शेतकरी संघटनांवर कठोर कारवाईची शक्यता देखील नाकारता येत नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. (हे वाचा- ‘लाठीकाठी बरोबर ठेवा’, शेतकरी नेत्याचा खळबळजनक VIDEO व्हायरल) सुरक्षा दल सज्ज! दिल्ली पोलिसांना मिळालेल्या सुचनेनुसार हिंसाचारग्रस्त भागात अतिरिक्त सुरक्षा दल तैनात करण्यात आलं आहे. मंगळवारी ज्या भागात हिंसाचार झाला, तेथील परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे. दिल्लीतील अनेक भागात संध्याकाळपर्यंत निमलष्करी दल देखील तैनात करण्यात येणार आहे. दिल्ली जवळच्या हरयाणा आणि उत्तर प्रदेश भागात विशेष खबरदारी घेतली जात आहे. फरिदाबाद, नोएडा, ग्रेटर नोएडा आणि गाझियाबाद या भागात विशेष दल तैनात करण्यात येणार आहे. (हे वाचा- Republic Day Violence: आतापर्यंत 15 FIR दाखल; पंजाबच्या गँगस्टर लक्खाचं नाव समोर) अनेक FIR दाखल होणार दिल्लीमध्ये मंगळवारी झालेल्या हिंसाचारात 230 पोलीस कर्मचारी आणि अधिकारी जखमी झाले आहेत. त्याचबरोबर बाहेरच्या जिल्ह्यातही 78 पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. या हिंसाचारानंतर दिल्लीतील वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये FIR दाखल करण्यात येत आहेत. दंग्यांना चिथावणी देणे, मारहाण, सरकारी वाहनांचं नुकसान करणे यासह विविध गुन्ह्यातील कलमांच्या अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. ‘दिल्ली पोलिसांनी या हिंसाचाराच्या दरम्यान अतिशय संयम बाळगला. पोलिसांनी या हिंसाचाराला उत्तर देण्यासाठी कारवाई केली असती तर दंगल अधिक भडकली असती. गृहमंत्रालयानं या हल्ल्यातील सूत्रधारांवर कठोर कारवाई करावी,’ अशी मागणी दिल्लीचे पोलिसांचे माजी सह आयुक्त एसबीएस त्यागी यांनी केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या