JOIN US
मराठी बातम्या / देश / 9 वर्षांच्या मुलीला भावोजीनं दिल्या नरकयातना, 4 महिन्यांच्या डिप्रेशननंतर 'अशी' समजली आपबिती

9 वर्षांच्या मुलीला भावोजीनं दिल्या नरकयातना, 4 महिन्यांच्या डिप्रेशननंतर 'अशी' समजली आपबिती

पुन्हा एकदा माणुसकी आणि नातेसंबंधांना लाजवणारी घटना समोर आली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 09 डिसेंबर: देशाची राजधानी दिल्लीत (Delhi) पुन्हा एकदा माणुसकी आणि नातेसंबंधांना लाजवणारी घटना समोर आली आहे. येथे एका नऊ वर्षाच्या मुलीवर (Minor Girl Raped by Brother in Law)तिच्या भावोजीनं बलात्कार केला. या घटनेनंतर मुलगी डिप्रेशनमध्ये गेली. त्यानंतर तिला डॉक्टरांकडे नेले असता ही बाब उघडकीस आली. पीडित मुलीच्या नातेवाईकांच्या तक्रारीवरून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. हे प्रकरण दिल्लीतील गोविंदपुरी येथील आहे. जिथे पीडित मुलगी तिच्या कुटुंबासह राहते. घरी आई-वडील आणि भाऊ- बहिण आहेत. मोठ्या बहिणीचं लग्न उत्तर प्रदेशच्या पीलीभीतमध्ये राहणाऱ्या तरुणसोबत झालं आहे. यावर्षी रक्षाबंधनाला मोठी बहीण आपल्या पतीसोबत भावाला राखी बांधण्यासाठी घरी आली होती. रक्षाबंधनाच्या दिवशी संध्याकाळी घरातील सर्व सदस्य बाहेर गेले होते. यावेळी घरात फक्त मुलगी आणि तिचा भावोजी होता. संधी पाहून हैवान भावोजीनं मुलीवर बलात्कार केला. पीडिता गेली डिप्रेशनमध्ये या घटनेनंतर मुलगी एकदम शांत झाली आणि डिप्रेशनमध्ये गेली. मुलीच्या वागण्यात झालेला बदल पाहून घरातील लोक अस्वस्थ झाले. मुलीने विचारल्यावरही ती काहीच बोलली नाही. घरातल्यांना जादूटोणा झाल्याचा संशय आल्यानं बाहेर त्याची चौकशी करुन त्यावर उपाय केले. पण काहीही झाले नाही. हेही वाचा-  69 ऊस कामगारांचं कोल्हापुरातून रेस्क्यू, अमानूष वागणूक देत ठेवलं होतं ओलीस त्यानंतर मुलीचे आई-वडिल तिला डॉक्टरांकडे घेऊन गेले. मुलीचे काउसलिंग केले असता, तिनं घडलेला सर्व प्रकार सांगितलं. तिनं डॉक्टरांना सांगितलं की, तिच्या भावोजीनं तिच्यावर बलात्कार केला.  त्यानंतर मंगळवारी कुटुंबीयांनी गोविंदपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या