JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / देश / Delhi Blast: बॉम्ब बनवण्यासाठी वापरण्यात आल्या या वस्तू? घटनास्थळाचे Exclusive फोटो

Delhi Blast: बॉम्ब बनवण्यासाठी वापरण्यात आल्या या वस्तू? घटनास्थळाचे Exclusive फोटो

Delhi Blast: याठिकाणी सापडलेल्या काही वस्तूंची पाहणी केली जात आहे. शिवाय परिसरात काही संशयास्पद हालचाली झाल्या होत्या का याचीही चौकशी केली जात आहे

0110

मध्य दिल्लीतील इस्रायली दूतवासाबाहेर शुक्रवारी कमी तीव्रतेचा बॉम्बस्फोट (Delhi Blast) झाला. या स्फोटाचा तपास करण्यासाठी विशेष पथकाला बोलावण्यात आलं आहे. दरम्यान या घटनास्थळाची विशेष पथकाकडून पाहणी केली जात आहे.

जाहिरात
0210

याठिकाणी सापडलेल्या काही वस्तूंची पाहणी केली जात आहे. शिवाय परिसरात काही संशयास्पद हालचाली झाल्या होत्या का याचीही चौकशी केली जात आहे

जाहिरात
0310

घटनास्थळी सापडलेले बॉल बेअरिंग, बॉम्ब बनवण्यासाठी याचा वापर करण्यात आल्याची शक्यता आहे

जाहिरात
0410

ज्याठिकाणी ही घटना घडली त्याठिकाणी असे तारांचे तुकडे देखील सापडले आहेत

जाहिरात
0510

बॉम्ब स्फोटाच्या ठिकाणाहून जप्त करण्यात आलेलं आर्टिकल

जाहिरात
0610

याठिकाणी विशेष पथकाला हे आर्टिकल सापडलं आहे. दरम्यान या पथकाला घटनास्थळी इस्लायल ऍम्बसीचा (Israel Embassy) पत्ता असलेलं एक बंद पाकीट सापडलं आहे. या पाकिटावर इस्रायलच्या दूतवासातील एका अधिकाऱ्याबाबत मजकूर लिहिलेला आहे. या पाकिटाचा आणि त्याच्यावरच्या मजकुराचा बॉम्बस्फोटाशी संबंध आहे का, याचा तपास विशेष पथक करत आहे.

जाहिरात
0710

दरम्यान या स्फोटावेळची सीसीटीव्ही दृष्य पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. या फूटेजमध्ये एका टॅक्सीतून दोन जण खाली उतरून घटनास्थळी पोहोचले आणि त्यानंतर ही टॅक्सी रवाना झाली. हे दोघंही संशयीत स्फोट घडवण्यासाठी चालत तिकडे गेले होते. पोलिसांच्या पथकाने या टॅक्सी चालकाची चौकशी केली आहे. बॉम्ब लावल्यानंतर दोन्ही संशयीत तिकडून पळून गेले आहेत.

जाहिरात
0810

दहशत पसरवण्यासाठी हा बॉम्बस्फोट करण्यात आल्याचा विशेष पथकाचा प्राथमिक अंदाज आहे. पथकाला सीसीटीव्हीमध्ये एक संशयास्पद कारही दिसली आहेर. तसंच स्फोट झाला त्यावेली परिसरात किती मोबाईल कार्यरत होते, याची माहिती घेण्यासाठी डम्प डेटाही घेतला जात आहे.

जाहिरात
0910

सूत्रांच्या माहितीनुसार याठिकाणाहून जप्त करण्यात आलेले पत्र त्यामध्ये इस्रायली राजदूत यांना संबोधित करण्यात आले आहे. ज्यामध्ये हा केवळ 'ट्रेलर' असल्याचं म्हटलं आहे. यामध्ये इराणमधील शक्तिशाली जनरल आणि परमाणू वैज्ञानिक यांच्या कामाचा उल्लेख आहे. त्यांच्या हत्येचा देखील उल्लेख आहे

जाहिरात
1010

दरम्यान दिल्ली पोलीस आणि भारतीय एजन्सी या घटनेचा सखोल तपास करत आहेत. त्यांच्या मदतीसाठी इस्रायली एजन्सीचे अधिकारी देखील रवाना झाले आहेत. शिवाय ज्याठिकाणी संशयास्पदरित्या इराणी लोकं लपलेले असू शकतात त्याठिकाणी दिल्ली पोलीस छापेमारी करत आहेत.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या