JOIN US
मराठी बातम्या / देश / कर्जाच्या बोज्यापायी बळीराजाने स्वत:लाच संपवल; तब्बल 10 दिवस झाडावर लटकट होता मृतदेह

कर्जाच्या बोज्यापायी बळीराजाने स्वत:लाच संपवल; तब्बल 10 दिवस झाडावर लटकट होता मृतदेह

कधी सुका तर कधी ओला दुष्काळाचा फटका पडत असल्याने शेतकऱ्यांनी कसं जगावं हा मोठा प्रश्न आहे.

जाहिरात

An Indian farmer looks at an overcast sky on the outskirts of Jammu, India, Tuesday, July 24, 2012. Indians have grown increasingly desperate waiting for the long-delayed monsoon, the annual rains that replenish rivers and quench crops to keep this agricultural nation of 1.2 billion fed through the year. So far the rains have fallen at least 22 percent below the national average. (AP Photo/Channi Anand)

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

सागर, 16 ऑक्टोबर : देशात कर्जाच्या ओझ्याखाली अडकलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा धक्कादायक (Suicide) प्रकार अद्यापही सुरू आहे. पुन्हा एकदा अशीच एक बातमी समोर आली आहे. ही घटना मध्यप्रदेशातील कुमेरिया गावातील आहे. येथे एक शेतकरी झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला. शेतकऱ्याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.  शेतकरी गेल्या 10 दिवसांपासून बेपत्ता होता. मिळालेल्या माहितीनुसार गेल्या 2 वर्षांपासून तो त्रस्त होता आणि दिवसेंदिवस त्याच्यावरील कर्जाचा बोझा वाढत होता. यामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्याने आत्महत्या केली. आता पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला आहे आणि तपास सुरू आहे.10   10 दिवसांपूर्वी झाले होते बेपत्ता मृत शेतकऱ्याच्या भावाने सांगितले की, मोठा भाऊ 10 दिवसांपूर्वी अचानक घरातून बेपत्ता झाला होता. पहिल्यांदा तर खूप शोध घेतला मात्र जेव्हा ते सापडले नाही त्यानंतर पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी बेपत्ता झाल्याचा गुन्हा दाखल केला.  मात्र तरीही त्यांचा तपास लागला नाही. यादरम्यान कुटुंबांनीही खूप शोधण्याचा प्रयत्न केला मात्र ते कुठेच सापडले नाहीत. हे ही वाचा- जळगाव हत्याकांडाला धक्कादायक वळण! अल्पवयीन मुलीवर झाला होता बलात्कार झाडावर लटकलेल्या अवस्थेत होता मृतदेह जंगलात काही लोक गेले, तेव्हा शेतकऱ्याच्या मृत्यूबाबत माहिती मिळाली. त्या लोकांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अनेक दिवसांपूर्वी शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याचा संशय आहे. पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टम करण्यासाठी पाठविला होता आणि आता त्यांचा मृतदेह कुटुंबीयांकडे सोपविण्यात आलं आहे. काही गावकरी जेव्हा जंगलात गेले तेव्हा शेतकऱ्याचा मृतदेह झाडावर गळफास घेतलेल्या अवस्थेट लटकलेला होता. त्याशिवाय मृतदेहाची दुर्गंधी सुटली होती. कर्जदार देत होते त्रास मिळालेल्या माहितीनुसार शेतकऱ्याची शेती गेल्या 2 वर्षांतून फार झाली नाही. यामुळे शेतकऱ्याला सातत्याने कर्ज घ्यावे लागत होते. गेल्या काही दिवसांपासून कर्जदार त्याच्याकडून पैसे मागत होते आणि यामुळे तो त्रस्त होता. सातत्याने पैशांची कमी असल्याने असल्याने तो तणावात होता. दहा दिवसांपूर्वी अचानक तो घरसोडून निघून गेला. तो गेल्यानंतर कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केला. अखेर एका जंगलात शेतकऱ्याचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत दिसला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या