नवी दिल्ली, 26 डिसेंबर: केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Union Minister Smriti Irani) यांच्या लेकीचा (Daughter) साखरपुडा (Engagement) नुकताच पार पडला. सोशल मीडियावरून शॅनेल इराणीच्या (Shanelle Irani) एंगेजमेंटचा (Engagement) फोटो त्यांनी शेअर केला असून आपल्या काळजाचा तुकडा आता अर्जून भल्लाकडे असल्याचं म्हटलं आहे. नाताळच्या मुहूर्तावर 25 डिसेंबरला त्यांचा साखरपुडा पार पडला. स्मृती इराणी यांनी केलेल्या पोस्टवर अनेकजण कमेंट्स करत असून शुभेच्छांचा अक्षरशः वर्षाव होत आहे.
स्मृती इराणींचं मुलीशी अनोखं नातं शॅनेल इराणी ही झुबीन इराणी आणि मोना इराणी यांची मुलगी. मात्र शॅनेलच्या जन्मानंतर झुबीन आणि मोना यांचा घटस्फोट झाला आणि झुबीन यांचा विवाह स्मृती इराणींसोबत झाला. तेव्हापासून शॅनेल आणि स्मृती इराणी यांच्यात आई आणि मुलीच्या नात्याचे अनोखे बंध तयार झाले. स्मृती इराणी यांना शॅनेलशिवाय झोहर आणि झोहिश नावाची दोन मुलं आहेत. शॅनेल प्रसिद्धीपासून दूर आपली आई सुरुवातीला टेलिव्हिजन क्षेत्रात आणि त्यानंतर राजकारणात लोकप्रिय आणि प्रसिद्ध व्यक्ती असतानादेखील शॅनेल मात्र या प्रकाशझोतापासून नेहमी दूर राहिली. तिचं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मुंबईत झालं. वादविवादाची नैसर्गिक आवड लक्षात घेऊन तिनं वकिलीचं शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला आणि कायद्याची पदवी संपादन केली. त्यानंतर अमेरिकेत जाऊन कायद्यातील पदव्युत्तर पदवीही मिळवली. गोवा आणि महाराष्ट्राच्या बार काऊन्सिलमध्ये 2012 साली तिनं नाव नोंदवलं आणि आंतरराष्ट्रीय आर्बिट्रेशन प्रॅक्टिस ग्रुपसोबत काम सुरू केलं. हे वाचा -
शाहरूख खानने ठेवलं नाव शॅनेल हे नाव अभिनेता शाहरूख खानच्या सांगण्यावरून ठेवण्यात आल्याचं एका रिपोर्टमध्ये म्हणण्यात आलं आहे. शाहरूख खान आणि झुबीन इराणी हे जुने मित्र आहेत. झुबीन यांच्या पहिल्या लेकीसाठी शाहरूखनं हे नाव सुचवलं आणि तेच ठेवण्यात आल्याचं सांगितलं जातं. शॅनेलची नेमकी जन्मतारीख सध्या माहित नसली तरी ती साधारण 28 वर्षांची असून तिच्या भावी आयुष्यासाठी लाखो युजर्सनी शुभेच्छा दिल्या आहेत.