मुंबई, 1 एप्रिल : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हत्येचा कटाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. या बाबत राष्ट्रीय तपास संस्थेला (NIA) धमकी देणारा ईमेल मिळाला आहे. या ई-मेलमध्ये धमकी देणाऱ्या व्यक्तीकडे 20 किलो आरडीएक्स असल्याचा दावाही करण्यात आला आहे. यापूर्वीही अनेकदा मोदींना मारण्याची योजना असल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. सुरक्षा यंत्रणा अलर्ट असल्याने हा डाव उधळला गेला. हाती आलेल्या बातमीनुसार, एमआयएच्या मुंबई शाखेला मोदींच्या हत्येचा कट असल्याचं पत्र मिळाले होते. या धमकीवजा मेलमध्ये 20 किलो आयडीएक्सद्वारे मोदींना मारणार असल्याचं धक्कादायक भाष्य केलं होतं. हे ही वाचा- परीक्षा पे चर्चा 2022: पंतप्रधान मोदींनी केलं विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांचं कौतुक; म्हणाले… या मेलमध्ये 2 कोटी नागरिकांना मारण्याची धमकीही देण्यात आली होती. मात्र हा मेल कुठून पाठवण्यात आला, त्यामागील तथ्य यासर्वांचा तपास सुरू आहे.