JOIN US
मराठी बातम्या / देश / Cyclone Tauktae: तौत्के वादळाचा तडाखा; अवघ्या 10 सेकंदात पत्ताच्या बंगल्या सारखे कोसळले घर, पाहा LIVE VIDEO

Cyclone Tauktae: तौत्के वादळाचा तडाखा; अवघ्या 10 सेकंदात पत्ताच्या बंगल्या सारखे कोसळले घर, पाहा LIVE VIDEO

केरळमध्ये तौत्के चक्रीवादळामुळे अवगघ्या 10 सेकंदातच एक दुमजली बंगला कोसळल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

केरळ, 15 मे: अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे निर्माण झालेले तौत्के चक्रीवादळ (Cyclone Tauktae) आता रौद्ररूप धारण करत असल्याचं दिसत आहे. केरळ **(Kerala)**मध्ये या चक्रीवादळाचा परिणाम दिसू लागला आहे. चक्रीवादळामुळे समुद्र किनाऱ्यावरील घरांचे नुकसान होत असून समुद्रही खळवळा आहे आणि लाटा किनाऱ्यावर मोठ्या वेगाने धडकत आहेत. तौत्के चक्रीवादळाचा परिणाम दक्षिणेकडील राज्यांत दिसू लागला आहे. केरळमधील किनारपट्टीच्या भागात असलेल्या कासारगोड येथे एक दुमजली बंगळा कोसळ्याची माहिती समोर आली आहे. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडीओ सुद्धा सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे. व्हिडीओत दिसत आहे की, समुद्र किनाऱ्यावर असलेला हा बंगला अवघ्या 10 सेकंदात कोसळला.

संबंधित बातम्या

कासारगोड येथे समुद्र किनाऱ्यावर एक दुमजली बंगला होता. हा बंगला पाहता पाहता जमिनदोस्त झाला. केरळसह दक्षिणेकडील राज्यांच्या समुद्र किनाऱ्यावर या चक्रीवादळाचा फटका बसताना दिसत आहे. Cyclone Tauktae : चक्रीवादळ सध्या आहे कुठे? पाहा LIVE cyclone tracking चक्रीवादळामुळे मुंबई, कोकण, गुजरात, कर्नाटक, तमिळनाडू, पुदुच्चेरी, केरळ आणि लक्षद्वीप या ठिकाणी तुरळक ते विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तसेच वादळी वारे ताशी 80 ते 90 किमी वेगाने वाहण्याचा अंदाजही हवामान खात्याने वर्तवला आहे. पुढील 3 तासांत वादळ अधिक तीव्र होणार पुढच्या 3 तासांत  चक्रीवादळ अधिक तीव्र होईल, तर पुढील 12 तासांत ते अतितीव्र रूप धारण करेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सध्या हे वादळ गोवा किनाऱ्यापासून 290 किमी, मुंबईपासून 650 किमी तर गुजरातपासून 880 किमी दूर आहे. उत्तरेच्या दिशेने ते 13 किमी प्रतितास या वेगाने पुढे सरकत आहे. आज 80 ते 115 या वेगाने वारे वाहणार आहेत. तर उद्या वाऱ्याची  गती ताशी115 ते 145 किमी अशी असेल. दक्षिण कोकण ते गोवा या पट्ट्यात मुसळधार ते अतिमूसळधार स्वरूपाचा पाऊस असेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या