JOIN US
मराठी बातम्या / देश / 'पंतप्रधान मोदी गप्प का?', इंधन दरवाढीवरील जुनं ट्विट शेअर करत क्रिकेटपटूनं विचारला प्रश्न

'पंतप्रधान मोदी गप्प का?', इंधन दरवाढीवरील जुनं ट्विट शेअर करत क्रिकेटपटूनं विचारला प्रश्न

नरेंद्र मोदी (Narendra Modi) 2012 साली गुजरातचे मुख्यमंत्री होते. तेव्हा मोदींनी केंद्र सरकारच्या इंधन धोरणावर टीका करणरे ट्विट केले होते. टीम इंडियाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेल्या क्रिकेटपटूनं ते ट्विट शेअर करत मोदींना प्रश्न विचारला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 5 जुलै : गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या (petrol diesel price hike) किंमतीमध्ये मोठी वाढ झाला आहे. अनेक राज्यांमध्ये या दरानं शंभरी ओलांडली आहे. परदेशी चलनांच्या आधारावर आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये कच्च्या तेलाच्या किंमती काय आहेत, या आधारावर रोज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल होत असतात. इंधन  दरवाढीपाठोपाठ जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीमध्येही वाढ झाल्यानं सर्वसामान्य नागरिक त्रस्त आहेत. कोरोना संकटामुळे बंद असलेले उद्योग, रोजगारामध्ये झालेली घट याचा सामना करणाऱ्या जनतेला या महागाईचा चटकाही सहन करावा लागतोय. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतीवर विरोधी पक्ष सरकारच्या विरोधात आक्रमक आहेत. काही महिन्यांपूर्वीच क्रिकेटमधून राजकारणात गेलेला आणि पहिल्याच विधानसभा निवडणुकीनंतर मंत्री झालेला बंगालचा क्रिकेटपटू मनोज तिवारी (Manoj Tiwary) याने या विषयावर पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (PM Narendra Modi) टीका केली आहे. तिवारीनं पंतप्रधानांनी 2012 साली केलेलं ट्विट शेअर करत त्यांना प्रश्न विचारला आहे. काय केलं होतं ट्विट? नरेंद्र मोदी 2012 साली गुजरातचे मुख्यमंत्री होते. तेव्हा मोदींनी केंद्र सरकारच्या इंधन धोरणावर टीका करणरे ट्विट केले होते. ‘पेट्रोलच्या किमतीमध्ये झालेली भरमसाठ दरवाढ हा युपीए सरकारच्या अपयशाचं मुख्य उदाहरण आहे. त्यामुळे गुजरात राज्यावर मोठा आर्थिक बोजा पडला आहे.’ असं ट्विट मोदींनी केलं होतं. मनोज तिवारीनं ते ट्विट शेअर करत मोदींना प्रश्न विचारला आहे. पेट्रोल किमतीमध्ये झालेली प्रचंड दरवाढ हे भाजपा सरकारच्या अपयशाचे उदाहरण आहे. कोरोना व्हायरसमुळे सर्वसामान्य जनता भरडली जात आहे. त्यातच हे संकट… पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र त्यावर गप्प आहेत.

संबंधित बातम्या

ममता सरकारमध्ये क्रीडा मंत्री पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) झालेल्या विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसनं (TMC) 200 पेक्षा जास्त जागा जिंकत सत्ता मिळवली आहे. टीम इंडियाचा माजी बॅट्समन मनोज तिवारी (Manoj Tiwary) हा या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसकडून विजयी झाला. पहिल्यांदाच आमदार झालेल्या तिवारीला ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी क्रीडा मंत्री बनवलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या