नैनीताल, 24 मार्च : हरिद्वार कुंभमेळ्यात (Haridwar Kumbh Mela) येणाऱ्या भाविकांसाठी आता आरटीपीसीआरची निगेटिव्ह रिपोर्ट अनिवार्य करण्यात आली आहे. मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत (Tirath Singh Rawat) यांनी हा रिपोर्ट आणला नाही तरी चालेल असं जाहीर केलं होतं. मात्र उच्च न्यायालयाने मुख्यमंत्र्यांच्या निर्णयावर पूर्णविराम लावला आहे. मुख्य सचिवांनी कोर्टात सांगितलं की, कोरोनाचा RTPCR रिपोर्ट अनिवार्य करण्यात आला आहे. (Kumbha mela are more strict) उच्च न्यायालयाने राज्य सरकारला आदेश दिला आहे की, केंद्र सरकारच्या SOP चं पालन करण्यात येईल. कोर्टाने कुंभमेळाव्याच्या अधिकाऱ्यांना आदेश दिला आहे की, कुंभमधील अपूर्ण राहिलेले कामं लवकर पूर्ण केली जावीत आणि मेळाच्या अधिकारी उच्च अधिकाऱ्यांसह निरीक्षण करीत 30 मार्चपर्यंत रिपोर्ट कोर्टात फाइल करावी. हे ही वाचा- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत महाराष्ट्रात Double Mutant Variant; काय आहे हा प्रकार? कोर्टाने आपल्या आदेशात सांगितलं की, महिलांच्या स्नान घाटात व्हिडिओ आणि फोटोग्राफी करण्यात येणार नाही याची काळजी घ्यावी. उत्तराखंडात या महिन्यात कुंभमेळा सुरू होत आहे. माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांच्याकडून पहिल्यांदा कुंभ मेळ्यात येणाऱ्यांना कडक कायद्याची घोषणा केली होती आणि RT-PCR निगेटिव्ह रिपोर्ट अनिवार्य केली होती. (Kumbha mela are more strict)
मात्र जेव्हा तीरथ सिंह रावत यांनी मुख्यमंत्री पदाची जबाबदारी घेतली त्यानंतर त्यांना कोणतेही निर्बंध नसल्याचं जाहीर केलं होतं. या निर्णयावर टीका केली जात होती. गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. उत्तराखंडमध्येही याचे परिणाम दिसून येत आहे. येथे सर्वसामान्यपणे 50 रुग्ण सापडत होते, आणि ती संख्या 100 पर्यंत पोहोचली आहे.