JOIN US
मराठी बातम्या / देश / लॉजमध्ये एका बेडवर या अवस्थेत आढळले प्रेमी-युगूल, ट्रेन हुकल्याचं सांगत बुक केली होती रुम

लॉजमध्ये एका बेडवर या अवस्थेत आढळले प्रेमी-युगूल, ट्रेन हुकल्याचं सांगत बुक केली होती रुम

मंगळवारी सकाळी ते गच्चीवर झाडांना पाणी देत ​​असताना शेजारच्या खोलीत राहणाऱ्या मुलाने शेजारच्या खोलीतून दुर्गंधी येत असल्याची तक्रार केली.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नालंदा, 12 जुलै : बिहारच्या नालंदा (Nalanda Bihar) जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. बिहार शरीफ येथील हॉटेलच्या खोलीत अर्धनग्न अवस्थेत प्रेमी युगूलाचा मृतदेह (Couple Dead Body Found in Nalanda) आढळून आले आहे. एकसोबत दोन मृतदेह आढळल्याच्या या घटनेने परिसर हादरला आहे. मृत तरुण आणि तरुणी हे नवादा जिल्ह्यातील काशीचक पोलीस स्टेशन (Kashichak Police Station) हद्दीतील मधेपूर गावातील रहिवासी आहेत. काय आहे संपूर्ण प्रकरण - रॉकी कुमार (वय 20), आणि सोनम कुमारी (वय - 17), अशी मृतांची नावे आहेत. मृत तरुणी सोनम कुमारी ही पश्चिम बंगालच्या वर्धमान येथे राहून शिक्षण घेत होती. गेस्ट हाऊसच्या केअरटेकरने सांगितले की, मंगळवारी सकाळी ते गच्चीवर झाडांना पाणी देत ​​असताना शेजारच्या खोलीत राहणाऱ्या मुलाने शेजारच्या खोलीतून दुर्गंधी येत असल्याची तक्रार केली. यावेळी त्यांनी खोली उघडायचा प्रयत्न केला तर तेव्हा दरवाजा आतून बंद होता. आवाज देऊनही आतून कोणताच प्रतिसाद आला नाही. यानंतर खोलीचे कुलूप तोडल्यावर आतमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला. आत दोघेही मृतावस्थेत पडले होते. यानंतर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. प्रेमी युगूलाने सोमवारी सकाळी 11 वाजता आपली कामाची ट्रेन चुकल्याचे सांगून रूम बुक केली होती. श्रमजीवी ट्रेनने ते दिल्लीला जाणार होते. मंगळवारी सकाळी साडेआठ वाजता श्रमजीवी ट्रेनने पकडायची असल्याचे या मुलाने सांगितले होते. या घटनेनंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. खिशात सापडलेल्या ओळखपत्राच्या आधारे दोघेही नवाडा आणि लखीसराय येथील रहिवासी असल्याची ओळख पटली आहे. हे प्रकरण प्रेमप्रकरणाचे असल्याचे दिसते, असे प्रथमदर्शनी बिहारचे एसएचओ संतोष कुमार यांनी सांगितले. हेही वाचा -  Crime Petrol पाहून वडिलांना मागितले 10 लाख, प्रेमविवाहासाठी तरुणीने प्रियकरासोबत मिळून रचला हा डाव मृत मुलगी पश्चिम बंगालमध्ये शिक्षण घेत होती -  सध्या दोघांच्या कुटुंबीयांना फोन करून याबाबत माहिती देण्यात आली आहे. किशोरी पश्चिम बंगालच्या वर्धमान जिल्ह्यातील मधेपुरा हायस्कूलमध्ये शिकत होती, जिथून ती 7 जुलैपासून बेपत्ता होती. या प्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात कुळची येथे अल्पवयीन बेपत्ता झाल्याचा गुन्हाही दाखल आहे. पोलीस नातेवाईकांच्या येण्याची वाट पाहत आहेत. नातेवाईक आल्यानंतरच संपूर्ण प्रकरण स्पष्ट होणार आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या