चेन्नई, 6 जानेवारी : तामिळनाडू सरकारनं (Tamilnadu government) नुकतीच कोरोनाकाळात (corona times) चित्रपटगृहांमध्ये 100 टक्के सीट्स भरण्याची परवानगी दिली आहे. मात्र या निर्णयाबद्दल सरकारला बरीच टीका सहन करावी लागते आहे. सोबतच एका डॉक्टरचं भावनिक पत्रही (letter by a doctor) या पार्श्वभूमीवर अजूनच व्हायरल (viral) झालं आहे. सरकारच्या या निर्णयानं व्यथित होत एका डॉक्टरनं अभिनेता विजय आणि सिलांबरसन यांच्यासह तामिळनाडू सरकारला एक पात्र लिहिलं आहे. पुदुच्चेरीच्या जवाहरलाल इन्स्टिट्यूट ऑफ पोस्टग्रॅज्युएट मेडिकल एजुकेशन अँड रिसर्च या संस्थेत निवासी डॉक्टर (resident doctor) अर्विनाथ श्रीनिवास (Aravinth Srinivas) या डॉक्टरनं हे पत्र लिहिलं आहे.
यात अर्विनाथ हे डॉक्टर म्हणतात की तो आणि त्याचे सहकारी हेच नाही, तर पोलीस, सफाई कर्मचारी असे सगळे फ्रंटलाईन वर्कर्स आता कमालीचे थकले आहेत. पुढं ते लिहितात, की या दीर्घकाळ चाललेल्या साथीच्या काळात कमीतकमी नुकसान व्यवम, लोकांचे प्राण वाचावेत यासाठी या सगळ्यांनी प्रचंड कष्ट घेतले आहेत. आता थोडा श्वास घेण्याची तरी उसंत मिळणे हा त्यांचा अधिकार आहे. इतर कुणाचा स्वार्थ आणि हाव यामुळे त्यांचा बळी घेतला जाऊ नये. 100 टक्के थिएटर भरणे हा जणू आत्महत्येचा प्रयत्न आहे. लोक अजूनही कोविड -19 (covid 19) मुळे मरत आहेत. अशा परिस्थितीत या निर्णय म्हणजे ‘होमिसाईड’ अर्थात सामूहिक कत्तल ठरू शकेल. अभिनेते आणि राजकारणी तर काय सिनेमागृहात जाऊन जीव धोक्यात घालणार नाहीत. सामान्य माणसांच्या जीवाची बोली लावणारा हा सौदा अत्यंत चुकीचा आहे.’ ही पोस्ट सोशल मीडियावर अनेकांचं लक्ष वेधून घेते आहे. अर्विनाथ यांनी फेसबुक प्रोफाईल लॉक केल्यानं मूळ पोस्ट उपलब्ध नसली तरी स्क्रीनशॉट्स व्हायरल झाले आहेत.