JOIN US
मराठी बातम्या / देश / भारतीयांनो सावध व्हा! कोरोनाचा नवा व्हेरिएंट अधिक धोकादायक, चौथ्या लाटेची भीती

भारतीयांनो सावध व्हा! कोरोनाचा नवा व्हेरिएंट अधिक धोकादायक, चौथ्या लाटेची भीती

BA.5 Variant आतापर्यंतचा सर्वांत धोकादायक असा आहे. या व्हेरियंटमुळे देशात कोरोनाची चौथी लाट (Covid fourth wave) येण्याची भीतीदेखील व्यक्त करण्यात येत आहे.

जाहिरात

कोरोनावर प्रभावी नव्या अँटिबॉडी सापडल्या.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 14 जुलै : कोरोनाची तिसरी लाट ओसरून आता बराच काळ झाला आहे. मात्र, अजूनही कोरोनाचं संकट पूर्णपणे टळलेलं नाही. तरीही लोक कोविड नियमांचं (Covid rules) पालन करताना दिसत नाहीयेत. अशातच देशात BA.5 हा कोरोनाचा व्हेरियंट (BA.5 Variant) वेगाने पसरत आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, हा व्हेरियंट आतापर्यंतचा सर्वांत धोकादायक असा आहे. या व्हेरियंटमुळे देशात कोरोनाची चौथी लाट (Covid fourth wave) येण्याची भीतीदेखील व्यक्त करण्यात येत आहे. TV9 हिंदीने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केलं आहे. कित्येक देशांमध्ये हाहाकार BA.5 हा कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरियंटचा सब-व्हेरियंट (Omicron sub variant) आहे. या व्हेरियंटचे रुग्ण युरोपात मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचं सीएनएनच्या एका रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय. चीनमध्येदेखील या विषाणूने थैमान घातलं असून, त्या ठिकाणी अगदी कडक लॉकडाउन लागू करण्यात येऊ शकतं. सोबतच अमेरिकेतही नव्या कोरोना रुग्णांपैकी 65 टक्के रुग्णांमध्ये हाच व्हेरियंट (BA.5 Variant of Corona) आढळून आला आहे. त्यामुळे भारतीयांनीही वेळीच सावध होणं गरजेचं आहे. Pregnancy Tips : तुम्ही गरोदर आहात की नाही, किती दिवसांत कळते?   किती घातक आहे व्हेरियंट? ‘स्क्रिप्स रिसर्च’चे कार्डिओलॉजिस्ट एरिक तोपोन यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे ओमिक्रॉन व्हेरियंटचे आतापर्यंतचं सर्वांत धोकादायक स्वरूप आहे. आधीच्या सर्व सब-व्हेरियंटपेक्षा वेगळा असलेला हा विषाणू थेट इम्युन सिस्टीमवर हल्ला करून (BA.5 Variant attacks on immune system) तिला नष्ट करतो. या विषाणूचा प्रसार वेगही आधीच्या व्हेरियंटच्या तुलनेत भरपूर आहे, असं तोपोन यांनी एका न्यूजलेटरमध्ये स्पष्ट केलं आहे. बीए.5 व्हेरियंटमध्ये विशेष काय? विशेष म्हणजे, कोविड लसीकरण झालं असलं तरीही बीए.5 व्हेरियंटची लागण होऊ शकते. याचा प्रसार वेगाने होत असला, तरीही यामुळे अगदी गंभीर आजार (BA.5 Symptoms) होत नाहीत. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, या व्हेरियंटची लागण झाल्यानंतर रुग्णालयात भरती होण्याचे प्रमाण वाढू शकतं. मात्र, दिलासादायक बाब ही आहे की यामुळे गंभीर आजार होत नसल्यामुळे आयसीयूमध्ये भरती होण्याची संख्या कमीच असेल. अर्थात, विषाणूचा वेगाने प्रसार होणे हे चिंताजनक असल्याचं डॉक्टरांनी म्हटलं आहे. Sitting Work : डेस्क जॉब करणाऱ्यांना जास्त असतो हृदयविकाराचा धोका, तज्ज्ञांनी सुचवले हे उपाय जागतिक आरोग्य संघटनेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, युरोपात या विषाणूमुळे रुग्णालयात भरती होणाऱ्या लोकांचे प्रमाण वाढले आहे. मात्र, आयसीयूमध्ये भरती होणाऱ्यांची संख्या कमी आहे. अमेरिकेतील व्हाईट हाऊसचे कोविड-19 रिस्पॉन्स कोऑर्डिनेटर म्हणून काम केलेल्या डॉ. आशिष झा यांनी सांगितले, “अमेरिकेत हा विषाणू वेगाने पसरत आहे. मात्र, आम्हाला त्यावरील उपचार पद्धती माहिती असल्यामुळे, त्याचा सामना करणे शक्य आहे. आम्ही त्यादृष्टीने योजना तयार करत आहोत.” एकूणच बीए.5 व्हेरियंट धोकादायक असला, तरीही कोरोना संबंधित नियमांचे पालन केल्यास त्यापासून बचाव शक्य आहे. त्यामुळे आपणही वेळीच खबरदारी घेतली, तर देशात चौथी लाट येण्यापूर्वीच तिला थोपवण्यात यश मिळेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या