सुरत, 27 एप्रिल: मागील काही दिवसांपासून देशात कोरोना रुग्णांची संख्या (Corona cases in India) झपाट्यानं वाढत आहे. कोरोना विषाणूची दुसरी लाट (Corona virus 2nd strain) अगदी नवजात बाळांपासून 100 वर्षांच्या वयोवृद्धांपर्यंत सर्वांसाठीच घातक ठरत आहे. त्यामुळे अनेकांचे बळी जात आहेत. तर दुसरीकडे, कोरोना विषाणूच्या संकटकाळात गरोदर महिलांना (pregnant woman in corona period) विविध शारीरिक समस्यांना सामोरं जावं लागतं आहे. खरंतर गरोदर असताना कोरोना विषाणूची बाधा झाल्यानंतर, संबंधित महिलांना अनेक गुंतागुंतीच्या शारीरिक समस्यांना सामोरे जावं लागत आहे. अशात बाळाचा आणि बाळाच्या आईचाही जीव टांगणीला लागत आहेत. एकंदरित अशी परिस्थिती असाताना अनेकांना सुखद धक्का देणारी आनंदाची बातमी समोर आली आहे. व्हेटिंलेटरवर उपचार घेणाऱ्या एका गर्भवती महिलेनं (pregnant woman on ventilator) बाळाला जन्म दिल्याची (give birth to a baby) घटना घडली आहे. संबंधित घटना गुजरातमधील सुरत याठिकाणी घडली आहे. येथील एक गरोदर महिला कोरोनाबाधित असल्यानं रुग्णालयात व्हेंटिलेटरवर उपचार घेत होती. दरम्यान तिला अचानक प्रसूती वेदना सुरू झाल्या त्यामुळे संबंधित महिलेचा आणि बाळाचा जीव वाचवणं डॉक्टरांसाठी आव्हानात्मक काम होतं. पण संबंधित महिलेनं व्हेटिंलेटर असतानाही एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. यानंतर डॉक्टरांनीही सुटकेचा निःश्वास घेतला. हे ही वाचा- पुणे तिथे काय उणे! 20 किमीपर्यंत मोफत रुग्णवाहिका सेवा, शहरात होतंय कौतुक विशेष म्हणजे प्रसूती झाल्यानंतर डॉक्टरांनी त्वरित बाळाची कोरोना चाचणी केली. यावेळी बाळाची ही चाचणी निगेटिव्ह आली आहे. यानंतर नातेवाईकासोबत डॉक्टरांनाही आनंदाचा पारावर उरला नाही. सध्या कोरोना बाधित आईवर रुग्णालयातचं उपचार सुरू असून बाळाची प्रकृती ठणठणीत आहे. खरंतर कोरोना विषाणूमुळे अनेकांचे जीव जात असताना, व्हेटिंलेटरवर असणाऱ्या महिलेनं बाळाला सुखरूप जन्म दिल्यानं हा एक चमत्कारचं मानला जात आहे.