JOIN US
मराठी बातम्या / देश / भारतातील कोरोनाची स्थिती; सांगताहेत COVID-19 रुग्णांचे नवे आकडे, 10 राज्यांमध्ये निर्बंध कायम

भारतातील कोरोनाची स्थिती; सांगताहेत COVID-19 रुग्णांचे नवे आकडे, 10 राज्यांमध्ये निर्बंध कायम

Corona Virus In India: देशात कोरोनाची (Corona Virus) दुसरी लाट आता आटोक्यात येत आहे. मात्र अजूनही काही राज्यांमध्ये कोरोनाची परिस्थिती चिंताजनक आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 27 जून: देशात कोरोनाची (Corona Virus) दुसरी लाट आता आटोक्यात येत आहे. कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस कमी होत आहे. अशातच देशात शनिवारी 49, 823 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. दिलासादायक गोष्ट म्हणजे, 57, 833 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मात्र 1258 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 15 दिवसांत देशात 5 लाख 37 हजार 481 अॅक्टिव्ह रुणांचा आकडा कमी झाला आहे. याआधी 10 जूनला 11 लाख 18 हजार 818 अॅक्टिव्ह रुग्ण होते. गेल्या काही दिवसात या आकड्यात घट झाली आहे. आता हा आकडा 5 लाख 81 हजार 104 वर पोहोचला आहे. या 10 राज्यांमध्ये परिस्थिती चिंताजनक देशातल्या 10 राज्यांमध्ये अजूनही कोरोनाची परिस्थिती चिंताजनक आहे. यात पश्चिम बंगाल, हिमाचल प्रदेश, झारखंड, छत्तीसगड, ओडिशा, कर्नाटक, तमिळनाडू, मिझोराम, गोवा आणि पुदुचेरी या राज्यांचा समावेश आहे. या राज्यांमध्ये गेल्या वर्षी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनसारखे निर्बंध लावण्यात आलेत. हेही वाचा-  राज्यातल्या 21 डेल्टा + व्हेरिएंटच्या रुग्णांचं लसीकरण झालं?, मोठी माहिती उघड 21 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात अनलॉकची प्रक्रिया देशातल्या 21 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये अनलॉकची प्रक्रिया सुरु आहे. मात्र काही प्रमाणात लॉकडाऊनसारखे निर्बंध देखील आहे. यात केरळ, बिहार, दिल्ली, महाराष्ट्र, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, हरियाणा, पंजाब, जम्मू- काश्मीर, लडाख, उत्तराखंड, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, मेघालय, नागालँड, आसाम, मणिपूर, त्रिपुरा, आंध्र प्रदेश आणि गुजरात यांचा समावेश आहे. हेही वाचा-  कोरोना लसीकरणाच्या आकड्यात भारतानं केली ‘या’ देशाची बरोबरी देशातील कोरोनाची आकडेवारी गेल्या 24 तासातील नवीन रुग्ण- 49,823 गेल्या 24 तासात कोरोनामुक्त रुग्ण- 57,833 गेल्या 24 तासातील एकूण मृत्यू- 1258 आतापर्यंतचा एकूण संक्रमित रुग्णांचा आकडा- 3.02 कोटी आतापर्यंत कोरोनामुक्त झालेले रुग्ण- 2.92 कोटी आतापर्यंतचा मृतांचा आकडा- 3.95 लाख सध्या उपचार घेत असलेल्या रूग्णांचा आकडा- 5.81 लाख

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या