JOIN US
मराठी बातम्या / देश / वाढत्या रुग्ण संख्येचा सर्वाधिक धोका लहान मुलांना, आरोग्य मंत्रालयानं दिला इशारा

वाढत्या रुग्ण संख्येचा सर्वाधिक धोका लहान मुलांना, आरोग्य मंत्रालयानं दिला इशारा

Corona Virus High Risk Children: लहान मुलांच्या कोरोना व्हायरस संदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं इशारा दिला आहे. वाचा सविस्तर

जाहिरात

हा आकडा राज्यात सर्वांत जास्त असून त्यात वेगानं वाढ होत आहे. बेंगळुरू प्रशासनानं दिलेल्या माहितीनुसार, 5 ते 10 ऑगस्ट या काळात 0 ते 9 वर्षे वयोगटातील 127 तर 10 ते 19 वर्षे वयोगटातील 174 मुलांना कोरोनाची लागण झाली आहे.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 17 जुलै: केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं (Health Ministry) लहान मुलांना कोरोना व्हायरसची (Coronavirus) लागण होण्याची शक्यता असल्याचा इशारा दिला आहे. तसंच देशातल्या बऱ्याच जिल्ह्यात कोविड 19 (Covid 19) रुग्णांच्या आकड्यात झालेल्या वाढीवर चिंताही व्यक्त केली आहे. देशातल्या कोरोनाच्या परिस्थितीवर पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल म्हणाले की, लहान मुलांना कोरोना व्हायरसपासून वाचवण्यासाठी योग्य नियोजन करण्याची गरज आहे. अजूनही 10 टक्क्यांहून अधिक पॉझिटिव्हिटी रेट नोंदवणाऱ्या देशातील जिल्ह्यांविषयी आरोग्य मंत्रालयाने सावधगिरी व्यक्त केली असून कोरोना व्हायरस अजून संपला नसल्याचं म्हटलं आहे. हेही वाचा-  शिवसेनेबरोबर आमचं वैर नाही, चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य मास्कचा वापर घटला गेल्या काही दिवसात मास्क वापरण्यात लक्षणीय घट झाल्याचं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव म्हणाले की, काही ठिकाणी निर्बंधात शिथिलता आल्यानंतर मास्कच्या वापरामध्ये लक्षणीय घट झाली असल्याचं आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. आपण मास्क वापरणं ही गोष्ट सामान्य प्रक्रियेत समाविष्ठ केली पाहिजे. पुढचे 100 ते 125 दिवस कोरोना लढ्यात महत्त्वाचे आता पुढील 100 ते 125 दिवस कोरोना लढ्यातील (Fight against corona in India) महत्त्वाचे दिवस आहेत, असं सांगत केंद्र सरकारने सर्वांना अलर्ट केलं आहे. देशात कोरोनाची प्रकरणं (Coronavirus in india) कमी होण्याचा वेग मंदावला आहे आणि ही धोक्याची घंटा आहे. पुढील 100 ते 125 दिवस भारतात कोरोना लढ्यात खूप महत्त्वाचे आहेत, असं नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल (VK Paul) यांनी सांगितलं आहे. VIDEO : ताबा सुटला अन् थेट दुचाकीसह दुकानात घुसला तरुण; CCTV मध्ये कैद झाली घटना कोरोना नियम शिथील केले जात आहे. अशात नागरिक अनेक ठिकाणी सर्रासपणे कोरोना नियमांचं उल्लंघन करत आहेत. गर्दी करणं, मास्कचा वापर न करणे असं बेफिकीरपणे लोक वागू लागले आहेत. त्यामुळेच तिसऱ्या लाट येणं अटळ आहे, असं तज्ज्ञांनीही सांगितलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या