प्रातिनिधीक फोटो
नवी दिल्ली, 15 एप्रिल : देशातील कोरोना स्थिती (Covid Outbreak in India) अतिशय चिंताजनक झाली असून दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या रेकॉर्ड ब्रेक नोंदी होत आहेत. तज्ज्ञ, डॉक्टरांनी वर्तवलेल्या अंदाजापेक्षा कोरोनाची दुसरी लाट फारच भीषण असल्याचे आता दिसत आहे. महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्येही मोठ्या प्रमाणात कारोनाचे रुग्ण सापडत आहेत. एकाच दिवशी देशात दोन लाखाच्या जवळपास कारोना रुग्ण सापडल्याने देशात कारोनाची स्थिती काय आहे याचा अंदाज येत आहे. बुधवारी झालेली 1 लाख 99 हजार 569 ही आत्तापर्यंतची देशातील उच्चांकी वाढ आहे. कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असताना आता मृतांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. केंद्रीय आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या चोवीस तासात 1037 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशातील एकूण बाधितांचा आकडा आता 1 कोटी 40 लाख 70 हजार 300 वर जाऊन पोचला आहे. कारोनातून रुग्ण बरे होण्याचा दरही (corona recovery rate) घसरून 89.51 टक्क्यांवर आला आहे. महाराष्ट्राला कोरोनाचा विळखा महाराष्ट्रातील (Maharashtra corona update) कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत असून रोज वाढणारी रुग्णसंख्या चिंतेचा विषय झाली आहे. राज्य सरकारच्या आरोग्य विभागाकडून प्राप्त आकडेवारीनुसार राज्यात बुधवारी 58 हजार 952 नव्या कोरोना रुग्णाची नोंद झाली आहे, तर 24 तासांत 39 हजार 624 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत 29 लाख 5 हजार 721 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात 24 तासांत 278 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूदर 1.64 टक्के एवढा आहे. राज्यात एकूण 35 लाख 78 हजार 160 रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात एकूण सक्रिय रुग्ण 6 लाख 12 हजार 70 इतके आहेत. (हे वाचा- आम्ही कोरोनावर नियंत्रण मिळवलेलं मात्र, BJPमुळे कोरोना वाढला : ममता बॅनर्जी ) उत्तर प्रदेशात कोरोनाचे 20 हजार 510 नवीन रुग्ण उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh Corona) गेल्या 24 तासांमध्ये कोविड -19 संसर्गामुळे आणखी 68 लोकांचा मृत्यू झाला आणि 20 हजार 510 नवीन रुग्णांची नोंद झाली. एका दिवसात सापडलेली ही सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अमित मोहन प्रसाद यांनी बुधवारी येथे सांगितले की, राज्यात गेल्या 24 तासात 68 लोकांचा मृत्यू झाला असून राज्यात या विषाणूमुळे मृत्यूची संख्या आतापर्यंत वाढून 9376 झाली आहे. गेल्या 24 तासांत राजधानी लखनौमध्ये सर्वाधिक 14 मृत्यू झाले. त्याशिवाय प्रयागराजमध्ये १०, मुरादाबाद आणि गोंडा येथे प्रत्येकी चार, कन्नौज, फर्रुखाबाद, वाराणसी आणि कानपूर नगरात प्रत्येकी तीन रुग्णांचा मृत्यू झाला. (हे वाचा- ‘विरोधी पक्षाने 1 मेपर्यंत घरीच बसावे’, शिवसेनेचा भाजपवर हल्लाबोल ) बिहारमध्ये कोरोनामुळे आणखी 21 जणांचा मृत्यू बिहारमध्ये कोरोना (Bhihar Corona Update) विषाणूच्या संक्रमणामुळे गेल्या 24 तासांत आणखीन 21 लोकांचा मृत्यू झाल्याने बुधवारी मृतांची संख्या 1651 वर पोचली. आतापर्यंत या आजाराची लागण झालेल्या लोकांची संख्या वाढून 29 लाख 5 हजार 171 झाली आहे. राज्यात या आजाराने मृत्यू झालेल्या रुग्णांची एकूण संख्या बुधवारी 1651 झाली.