JOIN US
मराठी बातम्या / देश / मोठी बातमी! काँग्रेसचं YouTube चॅनल अचानक डिलीट, नेमका प्रकार काय?

मोठी बातमी! काँग्रेसचं YouTube चॅनल अचानक डिलीट, नेमका प्रकार काय?

काँग्रेसचं अधिकृत YouTube चॅनल अचानक डिलीट करण्यात आलं आहे. त्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुबंई, 24 ऑगस्ट : राज्यात सध्या हिवाळी अधिवेशन सुरु आहे. या हिवाळी अधिवेशनादरम्यान सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील सुरु असलेलं घमासान संपूर्ण महाराष्ट्र आणि देश पाहत आहे. या घटना पाहिल्यानंतर महाराष्ट्राला असलेली राजकीय परंपरा आज टिकून राहिलीय का? असा प्रश्न उपस्थित होताय. विशेष म्हणजे सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील संघर्ष हा फक्त राज्य पातळीवर मर्यादित राहिलेला नाही. तर तसा संघर्ष देश पातळीवरही पाहायला मिळतोय. या सगळ्या घडामोडी एकीकडे घडत असताना काँग्रेसच्या गोटातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. काँग्रेसचं अधिकृत YouTube चॅनल अचानक डिलीट करण्यात आलं आहे. त्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. काँग्रेसकडून याबाबत अधिकृत माहिती जारी करण्यात आली आहे. आमचे YouTube चॅनल ‘भारतीय राष्ट्रीय काँग्रेस’ हटवण्यात आले आहे. आम्ही त्याचे निराकरण करत आहोत आणि Google/YouTube टीमच्या संपर्कात आहोत. तांत्रिक बिघाड झालाय की काही छेडछाडीचा हा प्रकार आहे याचा आम्ही तपास करत आहोत. आमचे YouTube चॅनल लवकरच पूर्ववत सुरु होईल, अशी आशा आहे, अशी माहिती काँग्रेसच्या अधिकृत सोशल मीडिया विभाग हाताळणाऱ्या टीमकडून देण्यात आली आहे. ( विधीमंडळाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी-विरोधी पक्षातील आमदार का भिडले? नक्की काय घडलं? ) देशातील महत्त्वाच्या आणि मोठ्या पक्षांचं सोशल मीडियावर अधिकृत अकाउंट आहेत. या पक्षांचे स्वत:चे यूट्यूबवर देखील चॅनल आहेत. यूट्यूब चॅनल हे जनता, सर्वसामान्य आणि घराघरात पोहोचण्याचं सोपं माध्यम आहे. ते खर्चिकही नाही. याशिवाय सहज लोकांपर्यंत आपण पोहोचू शकतो. त्यामुळे पक्ष या माध्यमाचा वापर करत आहेत. या चॅनलच्या माध्यमातून पक्षाचा प्रचार करण्याचा प्रयत्न केला जातो. पक्षाच्या बड्या नेत्यांची भाषण, कार्यक्रमे यूट्यूबवर लाईव्ह दाखवले जातात. पक्षाशी संबंधित अनेक व्हिडीओज शेअर केले जातात. या चॅनलला लाखो, कोट्यवधी फॉलोअर्स आहेत. काँग्रेस पक्षाच्या यूट्यूब चॅनलला देखील लाखो फॉलोअर्स आहेत. त्यामुळे हे चॅनल अचानक बंद झाल्याने खळबळ उडाली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या