मुंबई, 17 ऑक्टोबर : राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला देशभरात मोठा प्रतिसाद मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली होत असलेल्या या यात्रेने एक हजार किलोमीटरचं अंतर पार केलं आहे. दरम्यान राहुल गांधींना एका वृद्ध महिलेने खास गिफ्ट दिलं. याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही वृद्ध महिला राहुल गांधीसाठी आपल्या शेतातून काकड्या घेऊन आली होती. यावेळी ती म्हणते की, माझं कुटुंब खूप गरीब आहे. माझ्याजवळ संपत्तीच्या नावाखाली एक शेतच आहे. जे तुमची आजी इंदिरा गांधी यांच्या भूमी सुधार अधिनियमामुळे मिळालं होतं. ही काकडी त्याच शेतातील आहे.
कधी झाली यात्रेला सुरुवात.. भारत जोडो यात्रा 7 सप्टेंबरपासून कन्याकुमारी येथून सुरू झाली आहे. आतापर्यंत तामिळनाडू, केरळ, कर्नाटक आणि आंध्रप्रदेश या राज्यातून गेली आहे. भारत जोडो यात्रा 9 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात प्रवेश करणार असल्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एनसीपी सुप्रिमो शरद पवार आणि सुप्रिया सुळे त्यांचं स्वागत करण्याची शक्यता आहे.
12 राज्यातून करणार प्रवास… काँग्रेसची 3750 किमीची भारत जोडो यात्रा 12 राज्यातून जाणार आहे. या यात्रेत राहुल गांधी बेरोजगारी आणि महागाईया मुद्द्यांवरुन केंद्र सरकारवर निशाणा साधत आहे.