JOIN US
मराठी बातम्या / देश / TRP: CNN-News18 प्रथम क्रमांकावर, लोकप्रियतेच्या बाबतीत 15+ वयोगटात अव्वल

TRP: CNN-News18 प्रथम क्रमांकावर, लोकप्रियतेच्या बाबतीत 15+ वयोगटात अव्वल

CNN-News18, Media Group: BARC ने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, CNN News18 ला ऑल इंडिया AB15+ मध्ये 26.3 टक्के हिस्सा मिळाला आहे. चांगल्या कंटेंटच्या आधारे CNN News18 ची दर्शकांची संख्या (Viewership) झपाट्याने वाढत आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 8 मे : CNN-News18 चं भारतीय वृत्त माध्यम जगतातील वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. BARC म्हणजेच ब्रॉडकास्ट ऑडियंस रिसर्च कौन्सिलने (Broadcast Audience Research Council) जारी केलेल्या दर्शकसंख्येच्या नवीन अहवालानुसार, CNN-News18 ने 15+ वयोगटातील प्रेक्षकांमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. तसंच या वयोगटात, CNN-News18 ही टाइम्स नाऊ आणि रिपब्लिकला मागे टाकत देशातील प्रथम क्रमांकाची इंग्रजी वृत्तवाहिनी बनली आहे. तर, प्राइम टाइम सेगमेंटमध्ये (Prime-Time segment) CNN-News18 ला 40 टक्के प्रेक्षकसंख्या मिळाली आहे. 15 हून अधिक वय असलेल्या वर्गातील सर्व दर्शकांपैकी सर्वाधिक 26.3 टक्के, (मग ते ग्रामीण असो की शहरी, देशभरात) CNN-News18 चे आहेत. BARC च्या 2022 च्या 14 व्या ते 17 व्या आठवड्याच्या आकडेवारीनुसार, रिपब्लिकने प्रेक्षकांमधील आपलं वर्चस्व गमावलं आहे आणि यादीत टाइम्स नाऊच्या मागे तिसऱ्या स्थानावर घसरलं आहे. टाइम्स नाऊने 15+ वयोगटातील सापेक्ष हिस्सा 25.6% नोंदविला आहे. तर, रिपब्लिक टीव्हीचा वाटा 25.40% आहे. इंडिया टुडे टीव्ही 12.40% मार्केट शेअरसह चौथ्या क्रमांकावर आहे. चांगल्या लेखनाच्या (Content) आधारावर, CNN-News 18 च्या दर्शकांची संख्या (Viewership) वेगाने वाढत आहे आणि त्यांचा दबदबा कायम आहे. ही बाब प्राइम टाइम सेगमेंटमध्येही  (म्हणजेच, सोमवार ते शुक्रवार दरम्यान सायंकाळी 6.00 ते रात्री 11.00 या वेळात) स्पष्टपणे दिसून येते. बीएआरसीच्या अहवालानुसार, सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी 6 ते 11 या वेळेत प्राइम टाइम स्लॉटमध्ये CNN-News 18 चा दर्शकांचा हिस्सा 40.2 टक्के आहे. बाकीच्या वाहिन्या या बाबतीत खूप मागे आहेत. रिपब्लिकचा हिस्सा 25 टक्के आणि टाइम्स नाऊचा फक्त 20.2 टक्के आहे.

CNN-News18 चे BARC च्या रेटिंगमध्ये अव्वल स्थानावर असणं हा दर्शकांची गोंगाटापेक्षा बातम्यांना जास्त पसंती असल्याचा पुरावा आहे. CNN-NEWS18 च्या निःपक्षपाती वृत्तांकन आणि व्यापक कव्हरेजने बातम्या प्रसारणाच्या क्षेत्रात नवीन बेंचमार्क सेट केले आहेत. देशभरात कव्हरेज, विस्तृत सामग्री आणि प्रोग्रामिंगवर अतिरिक्त लक्ष केंद्रित केल्यामुळे चॅनेलची दर्शक संख्या सतत वाढत आहे. हे आहे चॅनलचं उद्दिष्ट चॅनलच्या यशावर भाष्य करताना, CNN-News18 चे व्यवस्थापकीय संपादक जक्का जेकब म्हणाले, “मी आमच्या दर्शकांचे आभार मानू इच्छितो, ज्यांनी CNN-News18 च्या प्रोग्रामिंग आणि पत्रकारितेवर विश्वास दाखवला आहे. नेहमीच उत्कृष्टतेच्या मानकांनुसार जगण्याचा आमचा प्रयत्न राहिला आहे. यासाठी तुम्हाला आक्रोश करण्याची गरज नाही. आमच्या बातम्या आणि प्रोग्रामिंगमध्येही हे स्पष्टपणे दिसून येतं. ते म्हणाले की CNN-News18 ला देशातील सर्वात तरुण न्यूजरूम बनायचं आहे. आपण एका नव्या आणि तरूण भारताचे आरसे आहोत, जो स्वतःचं म्हणणं मांडण्यास कचरत नाही. आणि ही फक्त सुरुवात आहे. कट्टरतेशिवाय बातम्या प्रसारित करणं हे तत्त्व नेटवर्क18 ग्रुपच्या बिझनेस न्यूजच्या सीईओ स्मृती मेहरा म्हणाल्या, “कोणत्याही कट्टरतेशिवाय तार्किक आणि विचारप्रवर्तक रीतीने बातम्या सादर करणं हे आमचं तत्त्व आहे. तसंच, आम्ही युनिकॉर्नच्या प्रेरणादायी कथांवर आधारित ‘बिट्स टू बिलियन - द युनिकॉर्न स्टोरी’, सर्वाधिक चर्चेत असलेल्या बातम्यांतील तथ्यं थेटपणे मांडणारा ‘प्लेन स्पीक’ आणि कल्पना, नवकल्पनांचं सामर्थ्य दाखवून देणारा  ‘अ बिलियन न्यू आयडियाज’ यासारखे अनेक नवीन शो लॉन्च केले. या दूरदृष्टीमुळे या वाहिनीनं पहिला क्रमांक पटकावला आहे.” माध्यम म्हणून सामाजिक जबाबदारी याशिवाय, CNN-NEWS18 ने समाजाप्रती जबाबदारीच्या भावना जपली. देशातील विविध महत्त्वाच्या मोहिमांच्या मागे आपला आवाज आणि माध्यम म्हणून असलेली ताकद वापरली. काही मोहिमा राबवल्या. यातील काही उल्लेखनीय मोहिमा म्हणजे #DontShowMeYourFace. लोकांना कोरोनाच्या साथीच्या परिस्थितीत मास्क घालण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी ही मोहीम सोशल मीडियावर राबवली. तसंच, या काळात अथक सेवा दिल्याबद्दल डॉक्टरांचा सन्मान करण्यासाठी #ExtraordinaryAmongUs ही मोहीम चालवली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या