JOIN US
मराठी बातम्या / देश / अमरनाथमध्ये ढगफुटी, देवाच्या दारात मोठं संकट, यात्रेला गेलेल्या भाविकांवर काळाचा घाला

अमरनाथमध्ये ढगफुटी, देवाच्या दारात मोठं संकट, यात्रेला गेलेल्या भाविकांवर काळाचा घाला

जम्मू-काश्मीरच्या अमरनाथ येथे ढगफुटी झाल्याची माहिती समोर आली आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

श्रीनगर, 8 जुलै : आपल्या आयुष्यात आपण एकदातरी अमरनाथची (Amarnath) यात्रा करावी, असं म्हटलं जातं. अमरनाथची यात्रा केल्याने आपल्याला पुण्य मिळतं असं मानलं जातं. त्यामुळे हजारो भाविक दरवर्षी जम्मू काश्मीरमध्ये (Jammu Kashmir) असलेल्या अमरनाथमध्ये महादेवाच्या दर्शनासाठी जातात. मात्र अमरनाथच्या यात्रेला गेलेल्या तब्बल 10 ते 15 हजार भाविकांवर आज मोठं संकट कोसळलं. अमरनाथमध्ये होली गुहेजवळ अचानक मोठा पाऊस झाला. खरंतर ही ढगफुटीच (Cloudburst in Amarnath) होती. या ढगफुटीमुळे गुहेजवळ पाण्याच्या प्रवाहाने अक्षरश: हाहाकार माजवल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेत आतापर्यंत 5 भाविकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच 10 ते 15 हजार भाविक प्रभावित झाले आहेत. ते सध्या अमरनाथमध्ये अडकून पडले आहेत. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. घटनास्थळी रेस्क्यू टीम पोहोचली आहे. बचावाचं काम युद्ध पातळीवर सुरु आहे. नेमकं काय घडलं? जम्मू-काश्मीरच्या अमरनाथ येथे ढगफुटी झाल्याची माहिती समोर आली आहे. अमरनाथमध्ये होली गुहेजवळ संध्याकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास ढगफुटी झाल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच तातडीने बचाव पथक घटनास्थळी दाखल झालं आहे. विशेष म्हणजे सध्या अमरनाथची यात्रा सुरु आहे. या यात्रेदरम्यान ढगफुटीची धक्कादायक बातमी समोर आली. या ढगफुटीत काही भाविकांचा मृत्यू झाल्याची भीती वर्तवण्यात येत आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.

संबंधित बातम्या

काश्मीर झोन पोलिसांनी या घटनेवर ट्विटरवर प्रतिक्रिया दिली आहे. पाण्याच्या लोंढ्यात भाविकांचे काही तंबूत वाहून गेले आहेत. पोलिसांनी केलेल्या रेस्क्यूत आतापर्यंत दोन भाविकांचे मृतदेह सापडले आहेत. एनडीआरएफ आणि एसडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. परिस्थिती नियंत्रणात आहे, अशी प्रतिक्रिया पोलिसांनी दिली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या