JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / देश / Char Dham Railway project : चार धाम रेल्वे प्रोजेक्टचं काम जोरात, रेल्वेने जारी केले PHOTOS

Char Dham Railway project : चार धाम रेल्वे प्रोजेक्टचं काम जोरात, रेल्वेने जारी केले PHOTOS

Char Dham Railway project : चार धाम रेल्वे प्रकल्पांतर्गत सर्व चार धाम- केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री रेल्वे नेटवर्कशी जोडले जातील. हा रेल्वे मार्ग देवप्रयाग, श्रीनगर, रुद्रप्रयाग, गौचर आणि कर्णप्रयाग शहरांना जोडेल, जो डेहराडून, टिहरी, पौरी, रुद्रप्रयाग आणि चमोली या पाच जिल्ह्यांना जोडणारा असेल.

0105

भारतीय रेल्वे उत्तराखंडमधील चार धाम रेल्वे प्रकल्पाला गती देत ​​आहे. उत्तराखंडमधील दोन मोठ्या रेल्वे प्रकल्पांमध्ये चार धाम यात्रेची चार महत्त्वाची ठिकाणं ऋषिकेश आणि कर्णप्रयाग शहराशी जोडण्यासाठी ब्रॉडगेज लाइन जोडणे समाविष्ट आहे. यासंदर्भात माहिती शेअर करताना रेल्वे मंत्रालयाने या प्रकल्पाशी संबंधित अनेक फोटो शेअर केले आहेत.

जाहिरात
0205

रेल्वे मंत्रालयाने जारी केलेल्या ट्विटमध्ये लिहिलेलं आहे की, 'ऋषिकेश-कर्णप्रयाग दरम्यान चार धाम रेल्वे प्रकल्पाने वेग घेतला आहे. या महत्त्वाच्या प्रकल्पासाठी अलकनंदा नदीवर येणाऱ्या घाटांमध्ये प्रकल्पाचा सर्वात लांब पूल आहे, जो प्रस्तावित रेल्वे आहे.

जाहिरात
0305

या रेल्वे प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी रेल्वे राज्यमंत्री दर्शना जरदोश यांनी नुकतीच उत्तराखंडला भेट दिली. त्यांनी ऋषिकेश-कर्णप्रयाग प्रकल्पाच्या ठिकाणी भेट देऊन बोगद्याच्या कामाचा आणि ब्रॉडगेज लाइनचा आढावा घेतला. जरदोश यांनी त्यांच्या भेटीदरम्यान उत्तराखंडमधील रेल्वे नेटवर्कच्या सर्वांगीण विकासाचे आश्वासन दिले. ते म्हणाले की, दोन्ही रेल्वे प्रकल्पांमुळे राज्यात येणाऱ्या हजारो यात्रेकरू आणि पर्यटकांचा वेळ आणि प्रवास खर्च दोन्ही वाचणार आहेत.

जाहिरात
0405

या प्रकल्पांतर्गत सर्व चार धाम- केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री रेल्वे नेटवर्कने जोडले जातील. त्याच वेळी, ऋषिकेश आणि कर्णप्रयाग दरम्यान नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्गाचा प्रकल्प देखील उत्तराखंडसाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याचं बोललं जात आहे. हा रेल्वे मार्ग राज्यातील अनेक यात्रेकरूंसाठी उपयुक्त ठरेल, कारण यामुळे वेळ आणि प्रवास खर्च दोन्ही वाचेल आणि या क्षेत्रातील औद्योगिक विकासालाही चालना मिळेल.

जाहिरात
0505

हा रेल्वे मार्ग देवप्रयाग, श्रीनगर, रुद्रप्रयाग, गौचर आणि कर्णप्रयाग शहरांना जोडेल, जो डेहराडून, टिहरी, पौरी, रुद्रप्रयाग आणि चमोली या पाच जिल्ह्यांना जोडणार आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या