JOIN US
मराठी बातम्या / देश / जंगलात फिरायला गेलेल्या कुटुंबाला अचानक हेलिकॉप्टर खाली येताना दिसलं; CDS बिपिन रावत यांच्या Chopper Crash चा VIDEO असा आला पुढे

जंगलात फिरायला गेलेल्या कुटुंबाला अचानक हेलिकॉप्टर खाली येताना दिसलं; CDS बिपिन रावत यांच्या Chopper Crash चा VIDEO असा आला पुढे

हेलिकॉप्टर एमआय-17 आहे याची त्यांना कल्पना नव्हती. काही सेकंदात हेलिकॉप्टर धुक्यात गायब झाले आणि त्यांना मोठा आवाज ऐकू आला. त्यांनी आपसात चर्चाही केली की, हा अपघात तर झाला नसेल.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 10 डिसेंबर : चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल बिपिन रावत, त्यांच्या पत्नी यांच्यासह 13 शूरवीरांना बुधवारी तामिळनाडूमधील कुन्नूर येथे हेलिकॉप्टर अपघातात प्राण गमवावे लागले. या अपघातापूर्वीचा काही सेकंदाचा एक व्हिडिओ समोर आला होता, ज्यामध्ये हेलिकॉप्टर हवेतून खाली कोसळताना दिसत होते. व्हिडिओ बनवणाऱ्या नसीरने सांगितले की, तो कुटुंबासोबत सुट्टी असल्याने फिरण्यासाठी तिथे गेला होता. नासिरसोबत त्याचा एक मित्र पॉल होता. त्यानेही काही फोटो काढले होते. नासिरने  आज तक शी बोलताना सांगितले की, जेव्हा पॉल कट्टेरी येथे रेल्वे ट्रॅकजवळ फोटो काढत होता, तेव्हाच एक हेलिकॉप्टर आम्हाला जवळ येताना दिसले, ते पाहून त्याने त्याचा व्हिडिओ बनवला. हे हेलिकॉप्टर एमआय-17 आहे याची त्यांना कल्पना नव्हती. काही सेकंदात हेलिकॉप्टर धुक्यात गायब झाले आणि त्यांना मोठा आवाज ऐकू आला. यादरम्यान नसीरने हेलिकॉप्टरचा अपघात झाला असावा असा अंदाज व्यक्त केला. व्हिडिओ बनवणाऱ्या पॉलला नेमकं काय घडलं असावं याचा अंदाज येत नव्हता. मात्र त्यानंतर सर्वजण पुढे उटीला पोहचले, त्यावेळी त्यांना या अपघाताची माहिती मिळाली. नासिर म्हणाले की, सीडीएसही रावत हे हेलिकॉप्टरमध्ये असल्याचे कळताच आम्ही तातडीने पोलिसांशी संपर्क साधला आणि हा व्हिडिओ त्यांना पाठवला. हे वाचा -  आता AI नेच भविष्यात होणाऱ्या आजारांबाबत मिळणार माहिती, अभ्यासातून खुलासा ANI ने हा व्हिडिओ जारी केला हा व्हिडिओ एएनआय या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केला आहे. हा व्हिडिओ सीडीएस बिपिन रावत यांच्या त्याच अपघातग्रस्त एमआय-17 हेलिकॉप्टरचा असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. या व्हिडिओबाबत आधी पूर्णपणे स्पष्टता नव्हती, मात्र आता हा अपघातग्रस्त हेलिकॉप्टचाच व्हिडिओ असल्याचे समोर आले आहे.

संबंधित बातम्या

अपघात कसा झाला? सीडीएस बिपिन रावत, त्यांची पत्नी मधुलिका रावत आणि अनेक वरिष्ठ लष्करी अधिकारी बुधवारी 11.30 वाजता व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर MI-17 V-5 मध्ये सुलूरवरून कुन्नूरसाठी रवाना झाले. कुन्नूर येथील संरक्षण सेवा कर्मचारी महाविद्यालयात त्यांचे व्याख्यान होणार होते. हेलिकॉप्टरने पूर्णपणे सुरक्षितपणे उड्डाण केले होते. हे वाचा -  हॉटेलमध्ये Girlfriend सोबत सापडलेल्या पतीला पत्नीनं पळवून पळवून मारलं सीडीएस बिपिन रावत यांच्या हेलिकॉप्टरने सुमारे 50 मिनिटे प्रवास केला होता. सुलूर येथून सुमारे 94 किमीचा हवाई प्रवास पूर्ण झाला होता. पुढे फक्त 10 ते 15 किमी अंतर बाकी होते. हेलिकॉप्टर प्रवासाच्या शेवटच्या भागात होते. मात्र, अचानक हेलिकॉप्टर धक्के खात खाली वर होऊ लागले. पायलटचे नियंत्रण सुटले आणि काही मिनिटांतच हेलिकॉप्टर खाली कोसळले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या