JOIN US
मराठी बातम्या / देश / या समुदायाच्या महिलांवर सार्वजनिकपणे बलात्कार करेन; महंताच्या वादग्रस्त Video मुळे खळबळ

या समुदायाच्या महिलांवर सार्वजनिकपणे बलात्कार करेन; महंताच्या वादग्रस्त Video मुळे खळबळ

धक्कादायक बाब म्हणजे यावेळी पोलीस सुरक्षादेखील होती.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

लखनऊ, 8 एप्रिल : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh News) सीतापुरमध्ये महंत बजरंग मुनी दास यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे खळबळ उडाली आहे. त्यांच्या वक्तव्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Viral On Social Media) आल्यानंतर पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे. यात महंत गर्दीसमोर एका समुदायाच्या महिला आणि मुलींना घरातून पळवून सार्वजनिक ठिकाणी बलात्कार करण्याची धमकी दिली आहे.

शुक्रवारी महंत बजरंग मुनींचा हा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. यात महंतने दावा केला आहे की, काही लोक त्याच्या हत्येचं प्लानिंग करीत आहेत. यादरम्यान राष्ट्रीय महिला आयोगाने यूपी डीजीपीकडे याबाबत पुढील सात दिवसात रिपोर्ट मागितली आहे.

संबंधित बातम्या

विशेष संप्रदायाच्या महिलांवर आक्षेपार्ह वक्तव्य… मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या 2 एप्रिल रोजी महंत बजरंग मुनी दास खैराबाद भागातील शीशे मशिदीसमोर आले होते. यादरम्यानचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये महंत म्हणतात की…जर कोणती हिंदू मुलीची छेड काढली तर…तुमची सून, मुलीला सर्वांसमोर उचलून आणेल.

जाहिरात
जाहिरात

महंत इतकं म्हणून थांबले नाही तर ते पुढे म्हणाले की, माझ्या हत्येसाठी 28 लाख रुपये जमवण्यात आले आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडीओ आल्यानंतर प्रशासनाने कारवाई सुरू केली आहे. राष्ट्रीय महिला आयोगाने या प्रकरणात दखल घेत डीजीपींना पुढील सात दिवसात कारवाई करून रिपोर्ट देण्याची मागणी केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या