BSF
अमृतसर, 6 मार्च: अमृतसर येथील खासा गावात बीएसएफ जवानामध्ये आपापसात वाद झाल्याची माहिती समोर आली. मिळालेल्या माहितीनुसार हा वादा इतका पेटला की आपल्याच साथीदारांवार गोळबार केला. या गोळीबारामध्ये चार जवानांचा मृत्यू झाला. तर 10 जवान गंभीर जखमी झाले आहेत. अमृतसरमधील बीएसएफच्या मेसमध्ये एका बीएसएफ कॉन्स्टेबलने गोळीबार केला. या घटनेत चार जणांचा मृत्यू झाला. तर जखमी रुग्णांना उपचारासाठी गुरु नानक देव रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गोळ्या झाडणाऱ्या जवानाचे नाव कटप्पा असे आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. मात्र, बीएसएफ जवानाने केलेल्या गोळीबारामागील कारण अद्याप समजू शकलेले नाही. या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे. या घटनेबाबत बीएसएफकडून एक प्रेस रिलीझही जारी करण्यात आली आहे, ज्यामध्ये या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश कोर्ट ऑफ इन्क्वायरीला देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.