देवास, 4 जुलै : मध्यप्रदेशच्या देवास (Devas MP) राज्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लोकांच्या जमावाने एका महिलेला शिवीगाळ करत जोरदार मारहाण (Brutality with Woman) केली. तसेच तिच्या पतीला खांद्यावर बसवून त्याची मिरवणूकही (Bratality with Tribal Woman) काढली. ही महिला आपल्या पतीला सोडून प्रियकरासोबत राहत होती. तिला शिक्षा करण्यासाठी लोकांनी रस्त्याच्या मधोमध तिच्यासोबत चुकीचे गैरवर्तन केले. महिलेची मिरवणूक काढत लोकांचा जमाव घोषणाबाजी करत होता आणि हसत होता. तर काही लोकांनी या महिलेला वाचवण्याचाही प्रयत्न केला. मात्र, काही जणांनी महिलेला सोडले नाही. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही धक्कादायक घटना बागलीच्या पुंजापुरा मध्ये घडली. याप्रकरणी उदयपुरा पोलीस ठाण्यात तिच्या पतीसह 11 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुंजापुरा हा आदिवासीबहुल भाग आहे. याठिकाणी बहुतांश घरे आदिवासी कुटुंबांची आहेत. याच समाजातील एका महिलेचा काही वर्षांपूर्वी मांगीलालसोबत विवाह झाला होता. दोघांनाही तीन मुले आहेत. महिलेचा तिच्या पतीसोबत वाद झाला होता. यानंतर तिने पती आणि मुलांना सोडून आपल्या प्रियकरासोबत राहण्याचा निर्णय घेतला. यानंतर 24 जूनपासून ती आपल्या प्रियकरासोबत राहत होती. रविवारी दुपारी अचानक तिचा पती गावातील काही लोकांसह पत्नीचा प्रियकराच्या घरी पोहोचला. यानंतर या लोकांनी महिलेचे केस ओढत तिला घराबाहेर ओढले. घराबाहेर ओढताच तिच्या पतीने तिला जोरदार मारहाण केली. त्याने तिला लाथाबुक्याने मारहाण केली. हेही वाचा - लेखकाचं अभिनेत्रीसोबत धक्कादायक कृ्त्य, लग्नाचे आश्वासन देऊन लिव्ह इनमध्ये राहिला अन् मग..
याप्रकरणी पोलीस उपअधीक्षक किरण शर्मा यांनी सांगितले की, ही घटना उदयपूरच्या बोरपडाव मध्ये घडली. याप्रकरणी हरिसिंह नावाच्या व्यक्तीने लिखित तक्रार केली आहे. या तक्रारीत त्याने म्हटले आहे की, मांगीलालने गावात पत्नीला अपमानित केले आहे. त्याने या महिलेला रस्त्याच्या मधोमध बेदम मारहाण करून तिचे केस ओढले.
याप्रकरणी पोलिसांनी तत्काळ कारवाई करत पतीसह अन्य 11 जणांवर गुन्हा दाखल केला. तसेच पोलिसांनी 10 जणांना अटक करून तुरुंगातही टाकले आहे. तर आणखी इतर आरोपींची ओळख पटवली जात आहे. त्यांची ओळख पटताच त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी माहितीही पोलिसांनी दिली.