JOIN US
मराठी बातम्या / देश / पाच वर्षांच्या रिलेशिपनंतर प्रियकराने दिला लग्नाला नकार; वाचा, प्रेयसीने पुढे काय केलं?

पाच वर्षांच्या रिलेशिपनंतर प्रियकराने दिला लग्नाला नकार; वाचा, प्रेयसीने पुढे काय केलं?

प्रेयसी ही दमोह (Damoh) येथील रहिवासी आहे. तर तिचा प्रियकर आकाश राठोड हा पथरिया येथील रहिवासी आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

दमोह (मध्यप्रदेश), 6 जून : प्रेमीयुगुलाच्या (Couple) संदर्भातील अनेक बातम्या तुम्ही वाचल्या असतील. मात्र, आता मध्यप्रदेशातील दमोह येथे एक वेगळीच बातमी समोर आली आहे. एक 19 वर्षाची मुलगी एक तक्रार घेऊन शहर पोलीस ठाण्यांतर्गत महिला ठाण्यात पोहोचली. यावेळी तिने आरोप केला की, तिचा प्रियकर (Boyfriend) दुसऱ्या मुलीसोबत लग्न करतोय. यानंतर पोलिसांनी या मुलीची तक्रार ऐकल्यानंतर तिचा प्रियकर आणि त्याच्या नातेवाईकांनाही पोलीस ठाण्यात बोलावले. यानंतर काही वेळाने वाद मिटला आणि दोघांनी मंदिरात लग्नही केले. मिळालेल्या माहितीनुसार, प्रेयसी ही दमोह (Damoh) येथील रहिवासी आहे. तर तिचा प्रियकर आकाश राठोड हा पथरिया येथील रहिवासी आहे. शनिवारी ही प्रेयसी (Girlfriend) पोलीस ठाण्यात तक्रार द्यायला आली होती. यानंतर तिने पोलिसांना सांगितले की, पाच वर्षाआधी मेलबारा गावात यात्रा भरली होती. याठिकाणीच तिची भेट आकाश नावाच्या तरुणासोबत झाली. यानंतर त्यादोघांमध्ये कायम संवाद होऊ लागल्यानंतर त्या दोघांमध्ये मैत्री झाली. यानंतर या तरुणीने पोलिसांना सांगितले की, त्यांच्या मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले. हे रिलेशनशिप पाच वर्ष चालले. मात्र, आकाशचे लग्न दुसऱ्या ठिकाणी जुळले आहे. तसेच 9 जूनला त्याचा साखरपुडा देखील होणार आहे, असे तिला माहित झाले. पोलिसांनी तिची पूर्ण बाजू ऐकली. यानंतर आकाश आणि त्याच्या परिवाराला बोलविण्यात आले. सर्वजण पोलीस ठाण्यात आल्यानंतर सर्वांनी आपली बाजू मांडली. यावेळी त्याच्यात वादही झाला. मात्र, पोलिसांनी त्यांचे समुपदेशन केले. दरम्यान, तरुणाचे या तरुणीवर प्रेम आहे. तसेच तो तिच्यासोबत लग्नही करायला तयार होता. मात्र, त्याचे वडिलांना हे लग्न मंजूर नव्हते. यानंतर पोलिसांनी त्यांना समजावले आणि सर्वांचे एकमत झाले. यानंतर दोन्ही प्रेमीयुगुलाने लग्नासाठी शहरातील जटाशंकर येथील मंदिरात लग्न केले. यादरम्यान मुलीच्या कुटुंबीयांना राग आला आणि ते लग्नाला उपस्थित राहिले नाही. हेही वाचा -  फेसबूक फ्रेंड दलित असल्याचं कळताच तरुणीकडून बेदम मारहाण, विष पाजलं; तरुणाचा मृत्यू आकाशने सांगितले की, आपच्या दोघांच्या नात्याला दोन्ही परिवारांची परवानगी नव्हती. मात्र, पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर माझ्या वडिलांनी लग्नाला परवानगी दिली. याप्रकरणी महिला पोलीस ठाण्याच्या प्रभारी सुषमा श्रीवास्तव म्हणाल्या की, तरुणी पोलीस ठाण्यात तक्रार घेऊन आली होती. तिने दिलेल्या तक्रारीनंतर लगेच कारवाई करण्यात आली. यानंतर तिचा प्रियकर तिच्यासोबत राहायला तयार झाला. त्या दोघांच्या लग्नासाठी परिवाराचे समुपदेशन करण्यात आले, अशी माहितीही त्यांनी दिली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या