जयपूर (राजस्थान), 19 एप्रिल : राजस्थान विधानसभेचे विरोधा पक्षनेते गुलाबचंद कटारिया (Gulabchand Kataria) हे त्यांच्या वादग्रस्त वक्त्यवांमुळे चर्चेत राहिले आहे. आता त्यांनी बोहेडा येथील एका कार्यक्रमात आणखी एक मोठे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, रावणाने सीतेचे अपहरण करुन कोणता मोठा गुन्हा केला नाही. कारण रावणाने सीतेला स्पर्श केला नव्हता. उदयपूर जिल्ह्यातील वल्लभनगर विधानसभेचे माजी आमदार रणधीर सिंह भींडर (Randhir Singh Bhindar) यांनी एक व्हिडिओ शेअर करत त्यांनी भाजप नेते गुलाबचंद कटारिया यांच्यावर निशाणा शाधला. ते म्हणाले की, कटारियाच्या मते रावण खूप सिद्धांतिक व्यक्ती होता. त्याने काही मोठा गुन्हा केला नाही.
सीतेचे अपहरण एक सामान्य विषय होता. जर रावणाने सितेला स्पर्श केला असता तर तो गुन्हा झाला असता. कटारियांच्या मते जर कुणाच्या पत्नीचे अपहरण करुन स्पर्श केला नाही तर तो गुन्हा नाही, या शब्दात रणधीर सिंह यांनी कटारिया यांच्यावर टीका केली. रणधीर सिंह भीडर हे जनता सेनाचे प्रमुख आहेत. तसेच माजी आमदार आहेत. जर रावणाने कोणताच गुन्हा केला नाही तर कटारिया संपूर्ण रामायण खोटे आहे, असे सिद्ध करत आहेत, जेव्हा की भगवान राम यांचा जन्म रावण या राक्षसाचा वध करण्यासाठीच झाला होता. हेही वाचा - Watch Video: हनुमान जयंतीच्या शोभा यात्रेत मुस्लिम बांधवांचं कौतुकास्पद कृत्य, हिंदू भाविकांसाठी केलं ‘हे’ काम ते हिंदू नाहीत, त्यांना तिकडे पाठवायला हवे - रणधीर सिंह भीडर यांनी कटारिया यांच्यावर जोरदार टीका करत म्हटले की, कटारिया ह रावणाचेच अनुयायी आहेत. यामुळेच भगवान राम, महाराणा प्रताप आणि आपल्या इतिहासाला शिव्या देत राहतात. व्यक्तिचे बोलणेच त्याचे चरित्र कसे आहे, हे दाखवते. आता आम्हाला समजायला लागले आहे की, ते हिंदू आणि मेवाडी नाही तर श्रीलंकेतून आले आहेत. त्यांना त्यांचा आदर्श पुरुष रावणाला भेटण्यासाठी तिथेच पाठवून द्यायला हवे.