JOIN US
मराठी बातम्या / देश / बायकोनेच माझ्या खुनाची सुपारी दिली - भाजप नेत्याचा खळबळजनक आरोप

बायकोनेच माझ्या खुनाची सुपारी दिली - भाजप नेत्याचा खळबळजनक आरोप

‘पत्नीने आपल्याला मारायची सुपारी गुंडांना दिली आहे. त्यासाठी ती मोठी रक्कमही त्यांना देणार आहे. त्यांच्याा संभाषणाची ऑडिओ क्लिप आपल्याकडे आहे’, असं राष्ट्रीय प्रवक्तेपद असलेल्या या नेत्याने सांगितलं आहे आणि पोलिसात तक्रारही दाखल केली आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

लखनौ, 18 नोव्हेंबर : पत्नीचा आपल्या संपत्तीवर डोळा आणि पैसा हडप करण्यासाठी आपल्याला मारण्याची सुपारी तिने दिली आहे, असा खळबळजनक आरोप भाजपच्या नेत्याने केला आहे. एवढंच नाही तर पत्नीविरोधात त्यांनी पोलिसात तक्रारसुद्धा दाखल केली आहे. भारतीय जनता पक्षाच्या किसान मोर्चाचे राष्ट्रीय प्रवक्ते अनुपसिंह ठाकूर यांनी केलेल्या तक्रारीवरून खळबळ उडाली आहे. उत्तर प्रदेशताल्या बलिया इथले ते भाजपचे नेते आहेत. पत्नीनेच आपल्याला मारण्यासाठी गुंडाला सुपारी दिल्याची तक्रार त्यांनी पोलिसात दाखल केली होती. पोलिसांनी यासंदर्भात FIR नोंदवून घेतली आणि कथित गुंडाला अटकही केली आहे. विकास लोहाक आणि छोटे सिंह नावाच्या दोघांना पोलिसांनी या प्रकरणी अटक केली आहे. त्यांच्यावर भाजप नेते ठाकूर यांना मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. त्यांनी अनुप कुमार यांना जिवे मारण्यासाठी सुपारी घेतली अशी तक्रार आहे. पोलीस या दोघांकडे अधिक चौकशी करून तपास करत आहेत. अनुप सिंह आणि त्यांच्या पत्नीमध्ये कौटुंबिक कलह सुरू होता. हे पती-पत्नी यासाठी फॅमिली कोर्टातही गेले होते. त्यांचा खटला सुरू आहे. दरम्यान पत्नीने आपल्याला मारण्याची सुपारी दिल्याचा आरोप अनुप सिंह यांनी केला. छोटे सिंह आणि विकास लोहार यांनी आपली सुपारी घेतल्याचं अनुप सिंह यांचं म्हणणं आहे. यासाठी पत्नीने या दोघा कथित मारेकऱ्यांना भरपूर रक्कम देऊ केली असल्याचाही त्यांचा आरोप आहे. याचा पुरावा म्हणून त्यांनी पोलिसांना एक ऑडिओ क्लिप असल्याचं सांगितलं आहे. काही दिवसांपूर्वी आपल्या घरात घुसून गुंडांनी आपल्याला जिवे मारण्याची धमकी दिली होती, असंही अनुप सिंह यांनी तक्रारीत म्हटलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या