लखनौ, 2 नोव्हेंबर : उत्तर प्रदेशातल्या राज्यसभेच्या जागांसाठी घोषित केलेल्या निवडणुकीचे काही निकाल जाहीर झाले आहेत. भारतीय जनता पक्षाने काही जागांवर बिनविरोध विजय मिळवला आहे. उत्तर प्रदेशात भाजपला 10 पैकी 8 जागांवर विजय मिळवता आला. समाजवादी आणि बहुजन समाज पार्टीला प्रत्येकी एकेक जागा मिळवल्या. यामुळे राज्यसभेचं गणित पुरतं बदललं आहे. उत्तर प्रदेशातून काँग्रेसचे राज्यसभेत फक्त एकुलते एक खासदार राहिले आहेत. इतिहासात पहिल्यांदाच राज्यसभेत काँग्रेसचे एवढे कमी खासदार आता असतील. भाजपकडून केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी, अरुण सिंह, ब्रिज लाल, नीरज शेखर, गीता शाक्य, हरिद्वार दुबे, गीता शाक्य, बी एल वर्मा आणि सीमा द्विवेदी यांना राज्यसभेत पाठवलं गेलं. उत्तर प्रदेश आणि उत्तरांखंडमधील राज्यसभेच्या 11 जागांचे निकाल समोर आले आहेत. यात सर्वाधिक जागा भाजपला मिळाल्या आहेत. इतिहासात पहिल्यांदाच राज्यसभेतलं काँग्रेसचं संख्यापळ अगदी कमी झालं आहे. सध्याच्या घडीला काँग्रेसचे राज्यसभेत फक्त 38 खासदार आहेत, तर भाजप खासदारांची संख्या 92 झाली आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) चा विचार केला तर यापेक्षा अधिक जाहा एनडीएकडे आहेत. 112 जागांवर सध्या NDA खासदार आहेत, पण तरीही त्यांना अद्याप संपूर्ण बहुमत नाही. आणखी 10 जागा मिळाल्या तर लोकसभेबरोबर राज्यसभेतही NDA ला संपूर्ण बहुमत मिळेल. राज्यसभेच्या 245 जागांपैकी 12 जागांवर राष्ट्रपतींकडून नियुक्त झालेले खासदार म्हणून असतात. इतर जागांसाठी निवडणुका होऊन खासदार निवडले जातात.