भोपाळ, 20 ऑगस्ट: एका खासदारा (parliament member) विरोधात तक्रार दाखल होणं ही गोष्ट काही नवीन नाही. बिजू जनता दलाचे (Biju Janata Dal) खासदाराविरोधातही आता तक्रार दाखल झाली आहे. ओडिशाचे कटक लोकसभा खासदार भर्तृहरि महताब (Bhartruhari Mahtab) , त्यांची पत्नी आणि मुलाच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. हुंड्यासाठी सुनेचा (Dowry harassment) छळ केल्याप्रकरणी मध्य प्रदेश पोलिसांनी महताब यांच्याविरोधात कारवाई केली आहे. स्थानिक पोलीस अधिकारी अजिता नायर यांनी सांगितले की, महताब यांची 34 वर्षीय सून साक्षी यांनी बुधवारी भोपाळच्या महिला पोलीस स्टेशनमध्ये पती, सासरे आणि सासू यांच्या विरोधात हुंडासाठी छळवणूक केल्याची तक्रार दाखल केली. स्वातंत्र्यदिनीच तालिबान विरोधात लोकं रस्त्यावर, काबुलसह अनेक शहरात निदर्शने पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं की, लग्नात माझ्या कुटुंबियांनी खूप खर्च केला होता. आता माझ्यावर हुंड्यासाठी सासरचे लोकं छळ करत असल्याचं साक्षी यांनी तक्रारीत म्हटलं आहे. तसंच साक्षी यांनी आरोप केला आहे की, तिच्या कुटुंबाने 2016 मध्ये तिच्या सासऱ्यांना हुंडा म्हणून 1.5 कोटी दिले, पण ते अधिक पैशांची मागणी करत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खासदार, त्यांची पत्नी महाश्वेता आणि मुलगा लोकरंजन यांच्या विरोधात, IPC कलम 498 (विवाहित स्त्रीला गुन्हेगारी हेतूने फसवणे किंवा ताब्यात घेणे), 506 (गुन्हेगारी धमकावणे) आणि 34 (गुन्हेगारी कट) आणि हुंडा प्रतिबंधक कायदा, कलम 3/4 अंतर्गत (हुंडा घेणे आणि देणे किंवा हुंडा घेणे आणि देणे) असा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोपाळच्या महादेव परिसरात राहणारी तक्रारादर सून साक्षी यांचं लग्न ओडिशाच्या बीजू जनता दलाच्या खासदाराचा मुलगा लोकरंजन यांच्यासोबत 2016 ला दिल्लीत झालं.