JOIN US
मराठी बातम्या / देश / लग्नाच्या 6 महिन्यानंतर सासरी पोहोचली पत्नी, Boyfriend च्या मदतीनं काढला पतीचा काटा

लग्नाच्या 6 महिन्यानंतर सासरी पोहोचली पत्नी, Boyfriend च्या मदतीनं काढला पतीचा काटा

धक्कादायक म्हणजे मृताच्या पत्नीवर हत्येचा आरोप ठेवण्यात आला आहे. तिनं बॉयफ्रेंडच्या (Boyfriend) मदतीनं पतीला ठार केल्याचं बोललं जात आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

बिहार, 23 डिसेंबर: बिहारमधील (Bihar) जमुईमध्ये 6 महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या तरुणाची निर्घृण हत्या (Brutal Murder) करण्यात आली. धक्कादायक म्हणजे मृताच्या पत्नीवर हत्येचा आरोप ठेवण्यात आला आहे. तिनं बॉयफ्रेंडच्या (Boyfriend) मदतीनं पतीला ठार केल्याचं बोललं जात आहे. ही घटना जिल्ह्यातील चंद्रदीप पोलीस स्टेशन हद्दीतील सांपो गावातील आहे. तरुणाचा गळा चिरून हत्या करण्यात आला. सांपो गावाजवळील शेतातून त्याचा मृतदेह सापडला आहे. विकास कुमार असे मृताचे नाव आहे. मृताच्या भावाने दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी मृताची पत्नी काजल कुमारी हिने बॉयफ्रेंडला फोन करून पतीची ओळख करुन दिली होती आणि बॉयफ्रेंडच्या मदतीनं माझ्या भावाची हत्या करण्यात आली. लग्नानंतर 10 डिसेंबर रोजी मृताची पत्नी तिच्या माहेरून सासरच्या घरी आली होती. घटनेनंतर घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे. हेही वाचा-  IND vs SA: टीम इंडियाच्या ‘या’ बॉलरचा सचिन तेंडुलकर फॅन, प्रशंसा करत म्हणाला…   या घटनेबाबत सांगितलं जात आहे की, मंगळवारी संध्याकाळी उशिरा मृत विकास कुमार उर्फ ​​विकी (वय 22) याला कोणीतरी फोनकरुन घराबाहेर मोटरसायकल दुरुस्त करण्यासाठी बोलावलं होतं. त्यानंतर तो घरी परतलाच नाही. त्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी गावभर त्याचा शोध घेतला मात्र तो कुठेच सापडला नाही. यानंतर सकाळी गावाजवळील शेतात त्याचा मृतदेह विकृत अवस्थेत आढळून आला. कुटुंबीय घटनास्थळी पोहोचले असता त्यांना मृतदेह दिसला. मृत विकास उर्फ ​​विकीची पत्नी काजल कुमारी देखील घटनास्थळी पोहोचली असता तिला पाहून गावकरी संतप्त झाले. लोकांनीही या हत्येसाठी पत्नीला जबाबदार धरले. मृताच्या भावाने दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी पत्नी काजल कुमारीने शेखपुरा जिल्ह्यातील दिघापर गावातील एका तरुणाला बोलावलं होतं. त्यानंतर मृताच्या पत्नीने तो तरुण आपला भाऊ असल्याचं सासऱ्याच्या लोकांना सांगितलं होतं. विकासची पत्नी काजल कुमारीनं त्या तरुणाला पतीची ओळख पटवून देण्यासाठीच त्याला बोलावलं होतं आणि याच तरुणानं हत्येची घटना घडवून आणल्याचा आरोप करण्यात येत आहे. हेही वाचा-  मोठी बातमी: Omicron व्हेरिएंटवर दक्षिण आफ्रिकेत अभ्यास, झाले धक्कादायक खुलासे या प्रकरणी एसडीपीओ डॉ राकेश कुमार यांनी सांगितले की, 22 वर्षीय तरुणाच्या हत्येप्रकरणी त्याच्या पत्नीला ताब्यात घेण्यात आले असून, तिची चौकशी सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रेमप्रकरणातून पत्नीने पतीची हत्या केल्याचा आरोप केला जात आहे. सध्या पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या