नवी दिल्ली, 12 ऑक्टोबर: भारतातील लसीकरण मोहिमेसंदर्भात (Coronavirus Vaccination Drive in India) सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. भारत बायोटेकच्या लसीला सरकारने मान्यता (Bharat Biotech Covaxin Approved For Children) दिली आहे. ही लस दोन वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांनाही दिली जाऊ शकते. मिळालेल्या माहितीनुसार, या लसीच्या दोन डोसमध्ये 28 दिवसांचे अंतर ठेवावे लागेल. भारतात 2-18 वयोगटासाठी Covaxin लशीला मान्यता देण्यात आली आहे. केंद्र सरकारने 2 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांना लसीकरण करण्यास मान्यता दिली आहे. DCGI ने Covaxin लशीला मान्यता दिली आहे. सब्जेक्ट एक्सपर्ट कमिटीकडून या वयोगटातील मुलांसाठी लशीला परवानगी मिळाली आहे. त्यामुळे आता लहान मुलांच्या लसीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. आता लवकरच ही स्वदेशी लस मुलांना दिली जाईल.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या टप्प्यात 12 वर्षांवरील मुले आणि कोविड कंडिशन असलेल्या मुलांना प्राधान्य दिले जाईल. औषध नियामकांनी या वर्षी मे महिन्यात भारत बायोटेकला मुलांवर चाचण्या घेण्याची परवानगी दिली होती. ही चाचणी सप्टेंबरमध्ये पूर्ण झाली. 6 ऑक्टोबर रोजी कंपनीने पडताळणी आणि आपत्कालीन वापराच्या मंजुरीसाठी डेटा CDSCO ला सुपूर्द केला. ही लस प्री फिल्ड सिरिंज असणार आहे. त्यातही 0.5 मिलीचा डोस असेल. 2 वर्षांपर्यंतच्या मुलांच्या बाबतीत, जास्त डोसमुळे समस्या निर्माण होऊ शकतात. म्हणून मुलांच्या लसीसाठी PFS यंत्रणेवर जोर देण्यात आला. आधी भरलेली 0.5 मिली लस एकदा वापरल्यानंतर फेकून द्यावी लागेल. मुलांना लसीचे दोन्ही डोस 28 दिवसांच्या अंतराने दिले जातील.