JOIN US
मराठी बातम्या / देश / Street Dog Ban: 'या' मेट्रो शहराला भटक्या कुत्र्यांपासून मिळणार मुक्ती, प्रशासनाचा मोठा निर्णय

Street Dog Ban: 'या' मेट्रो शहराला भटक्या कुत्र्यांपासून मिळणार मुक्ती, प्रशासनाचा मोठा निर्णय

देशातील एका मेट्रो शहराला भटक्या कुत्र्यांपासून मुक्त करण्यासाठी तिथल्या प्रशासनाने मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. कोणतं आहे ते शहर जाणून घ्या.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 12 जुलै:  कुत्रा हा पाळीव प्राणी आहे. बऱ्याच जणांना कुत्री आवडतात. ते त्यांना पाळतात, अगदी घरातल्या माणसांप्रमाणे त्यांना जपतात. त्यामुळे पाळीव कुत्री ही जास्त हिंस्त्र नसतात; पण तुम्ही रस्त्यावरून जाताना भटकी कुत्री ( Bengaluru Street Dogs) पाहिलीत का? भटकी कुत्री रस्त्यावरून जाणाऱ्या प्रत्येक वाहनाच्या मागे धावतात. त्यांच्यावर जोरात भुंकतात आणि पाठलाग करतात. बऱ्याचदा या भटक्या कुत्र्यांमुळे अपघात होतात. अनेकदा अपघातात वाहनचालकांना जीवही गमवावा लागतो. शहरात भटक्या कुत्र्यांचे प्रमाण जास्त असते. स्थानिक प्रशासन कुत्र्यांचं प्रमाण कमी व्हावं, यासाठी त्यांची नसबंदी करण्यासारखी पावलं उचलतं. आता देशातील एका मेट्रो शहराला भटक्या कुत्र्यांपासून मुक्त करण्यासाठी तिथल्या प्रशासनाने मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. कर्नाटकची राजधानी बेंगळुरू लवकरच भटक्या कुत्र्यांपासून मुक्त होणार आहे. राज्याचे पशुसंवर्धन मंत्री प्रभू चौहान यांनी याबाबत मोठी घोषणा केली आहे. शहर भटक्या कुत्र्यांपासून मुक्त करण्यासाठी पशुसंवर्धन विभाग प्रयत्नशील असल्याचं त्यांनी सांगितलं. प्रभू चौहान म्हणाले की, शहरात कुत्र्यांचे हल्ले आणि रेबीजच्या काही घटनांबाबत अनेक तक्रारी आल्यानंतर पशुसंवर्धन विभाग बेंगळुरूला कुत्र्यांपासून मुक्त करण्याचा विचार करत आहे. या संदर्भात झी न्यूज हिंदीने वृत्त दिलंय.

संबंधित बातम्या

हेही वाचा - Ranveer Singh: ‘या’ ठिकाणी झालं रणवीरच्या बर्थ डेचं जंगी सेलिब्रेशन; दीपिकानं शेअर केले खास फोटो मंत्री प्रभू चौहान म्हणाले की, रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांना पकडून त्यांना आवश्यक त्या सर्व लसी देणं महत्त्वाचं आहे. आम्ही ते तर करूच शिवाय आम्ही त्यांना एका अशा आश्रयस्थानात आणण्याची योजना आखत आहोत जिथं त्यांना वाचवता येईल, आणि त्यांची योग्य काळजी घेतली जाईल. यामुळे स्थानिक लोकांना रस्त्यावर भटक्या कुत्र्यांमुळे होणारा त्रास कमी होईल, तसंच कुत्रीही त्यांच्या हक्काच्या ठिकाणी राहतील. रस्त्यावरील कुत्र्यांना पकडून त्यांना योग्य प्रकारे आश्रय देण्याचे फायदे व तोटे यावर चर्चा करण्यासाठी पशुसंवर्धन विभाग बैठक घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं. जनावरांसाठी काम करणाऱ्या काही स्वयंसेवी संस्थांसोबत आम्ही बीबीएमपी आणि संबंधित विभागाच्या बैठका घेतल्या आहेत. तसंच या बैठकींनंतर उपस्थित झालेल्या मुद्द्यांच्या आधारे या कुत्र्यांना आश्रय देण्याबद्दल लवकरच निर्णय घेतला जाईल, असं चौहान यांनी सांगितलं. भटक्या कुत्र्यांमुळे अनेक ठिकाणी नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्रात नाशिकमध्ये घराबाहेर खेळणाऱ्या एका लहान मुलावर मोकाट कुत्र्यांनी जीवघेणा हल्ला केला होता. या हल्ल्यात हा मुलगा गंभीर जखमी झाला होता. त्यामुळे बेंगळुरूमध्ये सुरू झालेले प्रयत्न एक चांगली सुरुवात आहे असं म्हणता येईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या