JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / देश / Bengaluru : अतिवृष्टीनंतर रस्ते बनले तलाव, 2 कामगारांचा मृत्यू, IMDचा ऑरेंज अलर्ट PHOTOS

Bengaluru : अतिवृष्टीनंतर रस्ते बनले तलाव, 2 कामगारांचा मृत्यू, IMDचा ऑरेंज अलर्ट PHOTOS

सध्या देशभरातील हवामानाची स्थिती वेगवेगळी आहे. उत्तर भारतात, काही काळापूर्वी उष्णतेनं विक्रम मोडला. दिल्लीत पारा 49 अंशांच्या पुढे गेला आहे. मुसळधार पावसामुळे आलेल्या पुराने आसाममध्ये हाहाकार माजवला आहे. आता बंगळुरूमध्ये पावसाने धुमाकूळ घातला आहे. वादळानंतर मंगळवारी सायंकाळपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यांना तलावाचं स्वरूप आलं आहे. शहरात अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. गुडघ्यापर्यंत पाणी भरलं आहे. मंगळवारी रात्री येथे 2 मजुरांचा मृत्यू झाला. भारतीय हवामान खात्याने बुधवारी आणखी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. भारतीय हवामान खात्याने (IMD) मंगळवारी केरळच्या नऊ जिल्ह्यांसाठी आज आणि बुधवारी सात जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला. म्हणजेच येथे मुसळधार पावसाची शक्यता आहे.

0107

उत्तर भारतातील लोक उष्णतेने त्रस्त आहेत. राजधानी दिल्लीत पारा 49 अंशांच्या पुढे गेला आहे. इथे लोक पावसाची वाट पाहत आहेत. मात्र दुसरीकडे कर्नाटकची राजधानी बेंगळुरूमध्ये पावसाने लोकांचे हाल केले. मंगळवारच्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक भागात वीज गेली आहे.

जाहिरात
0207

इंडियन एक्सप्रेस या इंग्रजी वृत्तपत्रानुसार, मंगळवारी रात्री मुसळधार पावसानंतर बेंगळुरूमध्ये पाइपलाइनवर दोन कामगार मृतावस्थेत आढळले. देव भरत (बिहार) आणि अंकित कुमार (उत्तर प्रदेश) अशी मृतांची नावं आहेत. पाऊस सुरू होताच कामगार पाइपलाइनमध्ये घुसले होते आणि सायंकाळी सात वाजेपर्यंत पाण्याची पातळी वाढल्यानं दोघांचाही मृत्यू झाला.

जाहिरात
0307

मंगळवारी बंगळुरूमध्ये सुरुवातीला पावसामुळे आल्हाददायक वातावरण निर्माण आलं. मात्र, पावसानं जोरदार आघाडी उघडल्यामुळं पाणी साचून जनजीवन विसकळीत झालं. रहिवासी भागात पाणी तुंबलं आहे. रस्त्यावर उभ्या असलेल्या गाड्या पाण्यात बुडाल्या आहेत. अनेक घरांमध्ये पाणी शिरलं आहे. अनेक भागात सर्वत्र पाणीच पाणी दिसत आहे.

जाहिरात
0407

लोकांनी सोशल मीडियावर टाकलेल्या व्हिडीओ आणि फोटोंमध्ये परिस्थितीचं गांभीर्य स्पष्टपणे दिसून येत आहे. एक व्हिडिओत मर्सिडीज अर्धी पाण्यात बुडलेली दिसत असून तिची दोन चाके उचलली गेली आहेत. अनेक ठिकाणी कार, बस आणि इतर वाहनं पाण्यात बुडाली. पाणी साचल्यानं अनेक भागात वाहतूक कोंडी झाली होती.

जाहिरात
0507

मीडिया रिपोर्ट्सनुसार, पावसाचा जोर इतका होता की, मौर्या रोड, चिकपेट, सुलतानपेट आणि नागरथपेठवर 4 फूट पाणी 3 फूट भरलं होतं. सिरसी सर्कल उड्डाणपुलावरही मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं. जयनगर, शिवाजी नगर. महालक्ष्मीपुरम, जेसी नगर. जेजेआर नगर आदी सखल भागातील घरांमध्ये पाणी शिरलं.

जाहिरात
0607

मुसळधार पावसाचा बंगळुरू मेट्रोवरही परिणाम झाला. वादळामुळे ग्रीन लाईन मिनिस्टर मॉल स्टेशनवर वीजपुरवठा खंडित झाला होता. ट्रान्सफॉर्मर ट्रिप झाल्यामुळे मेट्रोची वाहतूक काही काळ थांबवावी लागली. पर्पल लाईनवरील गाड्यांच्या वाहतुकीवरही परिणाम झाला. मात्र, नंतर गाड्या सुरू झाल्या. खराब हवामानाचा परिणाम विमान कंपन्यांवरही झाला. राजमुंद्री आणि कोलकाता येथून दोन उड्डाणे चेन्नईकडे वळवावी लागली.

जाहिरात
0707

कर्नाटकात अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने आधीच दिला होता. पुढील दोन दिवस कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडूमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असल्याचे सांगण्यात आले. दक्षिण-पश्चिम मान्सूनचा प्रभाव अंदमान-निकोबारमध्ये पोहोचल्याने अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला होता.त्यासाठी विभागाने ऑरेंज अलर्टही जारी केला होता. पुढील तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या