अयोध्येत राम मंदिराच्या (Ram mandir ayodhya) भूमिपूजनासाठी 3 किंवा 5 ऑगस्टचा मुहूर्त काढण्यात आला आहे. पण मंदिराचं नक्षीकाम आधीच पूर्ण झालं आहे. कसं दिसेल राममंदिर याचा अंदाज देतील हे फोटो..
अयोध्येत राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण देण्यात आलं आहे. त्यासाठी 3 किंवा 5 ऑगस्टचा मुहूर्त काढण्यात आला आहे.
प्रस्तावित राम मंदिर हे 161 फूट उंच असून त्याला 5 घुमटाकार शिखरं असणार आहेत. राम मंदिर परिसर आणि सर्व अयोध्येच्या विकासाचा नकाशा तयार केला जात आहे.
सुप्रीम कोर्टात ऐतिहासिक अयोध्या केसचा निकाल लागण्यापूर्वीच कारसेवकपुरममध्ये राममंदिराचं काम कित्येक वर्षांपूर्वीच सुरू झालं होतं.
अजूनही तिथे मंदिराचं काम सुरू आहे. अयोध्येच्या कारसेवकमपुरमच्या एका मोठ्या कार्यशाळेत भारताच्या विविध भागांतून भाविक येतात.
राम मंदिराच्या प्रस्तावित प्रतिकृतीला प्रमाण मानून दगडी कोरीव काम आणि खांबांवरचं नक्षीकाम या कार्यशाळेतच पूर्ण केलं जातंय. प्रत्यक्ष रामजन्मभूमीवर मंदिर उभारण्यासाठी यामुळे अजिबात वेळ लागणार नाही.
कारसेवकपुरमचे 78 वर्षीय सोमपुरा यांनी सांगितले की, या योजनेनुसार मंदिर 268 फूट लांब, 140 फूट रुंद आणि 128 फूट उंचीइतकं शिखर आहे.
50 टक्क्यांहून अधिक दगडी नक्षीकाम ऑक्टोबरमध्येच पूर्ण झालं असल्याचे इथले प्रभारी सांगतात. याचा अर्थ पहिला मजला पूर्ण आहे.
मंदिराच्या प्रत्येक बाजूला 106 खांब असतील आणि प्रत्येक खांबावर 16 मूर्ती असतील. अशा प्रकारे कारागिरांनी त्यांचे नक्षीकाम पूर्ण केलं आहे.
श्रीरामाचं नाव लिहिलेल्या विटा खांबांसाठी वापरल्या आहेत. दगड तासण्याचं काम इथे 29 वर्षांपूर्वीच सुरू झालं होतं.
सुप्रीम कोर्टात 16 ऑक्टोबरला अयोध्या प्रकरणी सुनावणी संपली आणि 9 नोव्हेंबर 2019 ला ऐतिहासिक निर्णय देण्यात आला. तेव्हापासून मंदिर उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे.
मध्यंतरी अयोध्येतल्या या कार्यशाळेचं काम मंदावलं होतं. कारागिरांची संख्या कमी झालं होतं. पण आता सुप्रीम कोर्टाच्या ऐतिहासिक निकालानंतर पुन्हा एकदा राममंदिर बांधणीच्या कामाला वेग आला आहे.