JOIN US
मराठी बातम्या / देश / पोलीस महिलेला कडक सॅल्युट! धावत्या रेल्वेतून पडणाऱ्या माणसाला वाचवतानाचा थरारक VIDEO आला समोर

पोलीस महिलेला कडक सॅल्युट! धावत्या रेल्वेतून पडणाऱ्या माणसाला वाचवतानाचा थरारक VIDEO आला समोर

हा VIDEO रेल्वे मंत्रालयानंही आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे. रेल्वे मंत्रालयानंही (ministry of Railways) हा व्हिडिओ शेअर करताना या महिला पोलिसाचं खूप कौतुक केलं आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

विशाखापट्टणम, 11 फेब्रुवारी : सोशल मीडियावर (social media) अनेक चित्रविचित्र, धक्कादायक गोष्टी व्हायरल होत असतात. विशेषतः रेल्वेसंदर्भातले व्हिडिओज तर अंगावर काटा आणणारे असतात. रेल्वेत केलेले स्टंट असो, की इयरफोन घातल्यानं रेल्वेचा आवाज न आल्यानं झालेले अपघात असो, हे व्हिडिओज धक्कादायक असतात. असाच एक व्हिडिओ विशाखापट्टणम रेल्वे स्टेशनवरून (visakhapatnam Railway station) आला आहे. सोशल मीडियावर RPF च्या एका महिला पोलिसाचा (RPF Woman Cop) व्हिडिओ वेगानं व्हायरल (video viral) होतो आहे. या महिला पोलिसानं काही असं करून दाखवलं आहे, की ज्यामुळं लोकांमध्ये तिची मोठीच चर्चा होते आहे. हा व्हिडिओ रेल्वे मंत्रालयानंही आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे. रेल्वे मंत्रालयानंही (ministry of Railways) हा व्हिडिओ शेअर करताना या महिला पोलिसाचं खूप कौतुक केलं आहे.

संबंधित बातम्या

ही घटना घडली ती अशी, की एक व्यक्ती चालत्या ट्रेनमध्ये (running train) चढण्याचा प्रयत्न करत होती. अचानक तिचा पाय घसरला. या सगळ्यातून शेवटी एक गंभीर अपघात (accident) घडला असता जर ही महिला पोलिसा त्यावेळी तिथं पोचली नसती. हा व्यक्ती घसरतो आहे हे पाहून महिला पोलिस पोचली आणि तिनं कमालीचं प्रसंगावधान दाखवलं. इतर सहकारी जवानांसह मिळून तिनं त्या व्यक्तीला आपल्याकडं ओढलं. त्याचा जीव (Saved his life) वाचला. हेही वाचा - तरुणीच्या अंगावर धडकली दुचाकी; शिपायाची भररस्त्यात चपलेनं केली धुलाई,VIDEO VIRAL रेल्वे मंत्रालयानं ही क्लिप ट्विटर अकाऊंटवर (twitter account) शेअर करत लिहिलं आहे, ‘सर्वात आधी येतं मानवतेची सेवा करणं. विशाखापट्टणम रेल्वे स्टेशनवर मेरी सहेली टीमच्या एका कर्तव्यदक्ष आरपीएफ महिला कॉन्स्टेबलनं एका प्रवाशाला चालत्या ट्रेनमधून पडण्यापासून वाचवलं. हे प्रकरण आरपीएफ पोलिसाच्या शरीरावर बांधण्यात आलेल्या कॅमेऱ्यांमध्ये चित्रित झालं. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होतो आहे. लोक या महिला पोलिसाचं भरभरून कौतुक करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या