JOIN US
मराठी बातम्या / देश / या PHOTO मागची कहाणी वाचून डोळ्यात पाणी येईल; अनेकांसाठी ठरलीये प्रेरणा!

या PHOTO मागची कहाणी वाचून डोळ्यात पाणी येईल; अनेकांसाठी ठरलीये प्रेरणा!

11 व्या वर्षीय ही मुलगी जे काही करते ते वाचून तुम्हालाही भरून येईल.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

इंफाल, 4 एप्रिल : मणिपूरमध्ये (Manipur News) राहणाऱ्या एका 11 वर्षीय चिमुरडीचा फोटो रविवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा फोटो पाहून लोक भावुक झाले. मीनिंग्सिनलिउ पमेई नावाची ही मुलगी (Manipur girl) अवघी 11 वर्षांची आहे. तिच्यावर आपल्या लहानग्या भावाची जबाबदारी आहे. ती खुर्चीवर बसली आहे आणि समोर ठेवलेल्या वहीत काहीतरी लिहित आहे. मुलीच्या मांडीवर तिचा भाऊ झोपला आहे. शाळेच्या वर्गात शिकतेय मुलगी… मुलगी सुदूर जेलियांग्रोंग नागा-बहुल तामेंगलोंग जिल्ह्यात राहणारी आहे. तिचे आई-वडील शेतात काम करतात. तो डेलोंग गावात स्वायत्त जिल्हा परिषदेच्या डेलोंग प्राथमिक विद्यालयात पहिलीत शिकते. हे ही वाचा- तुटला होता रुळ… पण वृद्ध महिलेने आपल्या लाल साडीने Alert देत वाचवला हजारो प्रवाशांचा जीव अभ्यासासह भावालाही सांभाळते… मानिंगसिलिउ चार भाऊ-बहिणींमध्ये सर्वात मोठी आहे. आई-बाबा कामावर गेल्यानंतर घर आणि छोट्या भाऊ-बहिणीची जबाबदारी तिच्यावर असते. छोट्या भावा-बहिणींवर ती काही महिन्यांच्या भावाला सोडून जाऊ शकत नाही. म्हणून तो शाळेत जाताना भावाला सोबत घेऊन जाते. ती शाळेचा गणवेश घालते, पाठीवर बॅग घेते आणि काही महिन्यांच्या भावाला कडेवर घेऊन पायी शाळेत जाते. मुलीचा अभ्यासासाठीची जिद्द पाहून लोक तिचं खूप कौतुक करीत आहेत. मुख्यमंत्री एन बीरेन सिंह यांनी एका चाइल्डलाइन सेवा दल मुलीच्या घरी पाठवलं. ही टीम बाल संरक्षण योजनेअंतर्गत मुलीला मदत करतील. कुटुंबीला तत्काळ दिलासा म्हणून रेशन देणार आहे. याशिवाय कैंद्रीय मंत्र्यांनी तिच्या कुटुंबाला 11 हजार रुपयांची आर्थिक मदत केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या