JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / देश / नदीच्या मधोमध अडकली पर्यटकांची कार; आर्मीच्या रेस्क्यू ऑपरेशनचे थरकाप उडवणारे दृश्य

नदीच्या मधोमध अडकली पर्यटकांची कार; आर्मीच्या रेस्क्यू ऑपरेशनचे थरकाप उडवणारे दृश्य

जम्मू-काश्मीर येथील निसर्ग सौंदर्याची भुरळ सर्वांनाच पडते. सध्या अमरनाथ यात्राही सुरू आहे. यामुळे या भागात पर्यटक मोठ्या प्रमाणात आहेत. अनेकदा पर्यटक अतिउत्साहाच्या भरात एखादं संकट ओढवून घेतात. अशाच प्रकारे येथील सोनमर्गला पिकनिकसाठी श्रीनगरचे 4 लोक सिंध नदीत त्यांच्या वाहनासह अडकले. दुपारी सुमारे 2.30 वाजता हा प्रकार घडला.

0105

सोनमर्गला पिकनिकसाठी आलेले श्रीनगरचे 4 लोक सिंध नदीत त्यांच्या वाहनासह अडकले. त्यांनी बालटालजवळ सिंध नदीच्या पलीकडच्या काठावर त्यांच्या चारचाकीतूनच जाण्याचा प्रयत्न केला.

जाहिरात
0205

अमरनाथ यात्रेसाठी बालटाल-डोमेल येथे तैनात असलेल्या बटालियनच्या भारतीय सैन्याच्या गस्त पथकानं सिंध नदीत हे वाहन पाहिलं.

जाहिरात
0305

बालटालजवळ या लोकांनी स्वतःच्या चारचाकी वाहनातून सिंध नदीच्या पलीकडच्या काठावर जाण्याचा प्रयत्न केला. भारतीय सैन्याच्या गस्त पथकानं हे वाहन नदीत अडकलेलं पाहिलं आणि तत्काळ रेस्क्यू मोहिमेला सुरुवात केली.

जाहिरात
0405

भारतीय लष्कराचं एक बचाव पथक तत्काळ रिकव्हरी वाहन आणि आवश्यक उपकरणांसह घटनास्थळी दाखल झालं आणि चौघांची सुखरूप सुटका केली.

जाहिरात
0505

सिंध नदीतून वाहन बाहेर काढण्यासाठी लष्करानं त्यांचा जेसीबी आणि रिकव्हरी वाहन वापरलं. चौघांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आलं आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या