JOIN US
मराठी बातम्या / देश / अण्णांच्या मनधरणीसाठी फडणवीस 'राळेगणसिद्धी'त, मध्यस्थीला यश येणार?

अण्णांच्या मनधरणीसाठी फडणवीस 'राळेगणसिद्धी'त, मध्यस्थीला यश येणार?

30 जानेवारीपासून आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं आहे. अण्णा हजारेंचं हे उपोषण राळेगणसिद्धी येथील यादव बाबा मंदिरात असणार आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 29 जानेवारी : देशाची राजधानी दिल्लीच्या सीमेवर मागील दोन महिन्यांपासून अधिक काळ कृषि कायद्याविरोधात (Agricultural law) शेतकऱ्यांचं आंदोलन (Farmers protest) सुरू असताना आता अण्णा हजारे देखी सरकारविरोधात 30 जानेवारीपासून आमरण उपोषण (Hunger Strike)करणार आहेत. 2018 पासून अण्णा हजारे  (Anna Hazare) स्वामीनाथन आयोगाच्या (Swaminathan Commission)  सिफारशी लागू करण्यासाठी केंद्र सरकारकडे विनंती करत आहेत. परंतु त्यांच्या विनंतीकडे लक्ष दिलं जात नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे. सरकारच्या या वृत्तीवर नाराज होऊन त्यांनी 30 जानेवारीपासून आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं आहे. अण्णा हजारेंचं हे उपोषण राळेगणसिद्धी येथील यादव बाबा मंदिरात असणार आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अण्णा हजारे यांची समजूत काढण्यासाठी सरकारने आतापासून प्रयत्न सुरू केले आहेत. अण्णा हजारे यांना उपोषणापासून रोखकण्यासाठी केंद्रीय कृषी राज्य मंत्री कैलास चौधरी आज राळेगणसिद्धी पोहचणार असून त्यांच्याशी चर्चा करणार आहेत. कैलास चौधरी यांच्याआधी महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष हरीभाऊ बागडे, भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील, अहमदनगरचे खासदार सुजय विखे पाटील यांच्यासह अनेक नेते मंडळी राळेगणसिद्धी येथे अण्णा हजारेंची समजूत काढण्यासाठी आले असल्याची माहिती आहे. भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज पुन्हा एकदा राळेगणसिद्धीत जाऊन अण्णा हजारे यांची भेट घेणार आहेत. अण्णांनी आंदोलन करू नये याकरता ते पुन्हा एकदा मनधरणीचे प्रयत्न करणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अण्णा हजारेंचं आमरण उपोषण पाहता देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांनी कृषी मंत्री नरेंद्र तोमर यांच्याशी चर्चा करून याप्रकरणी एक ड्राफ्ट तयार केला आहे. अण्णा हजारे यांना हा ड्राफ्ट दाखवला जाईल. त्यानंतर अण्णा हजारे त्यात काही कमी असल्यास ते कृषि मंत्र्यांना पाठवतील. त्यानंतर सरकारने यावर सहमती दर्शवल्यास कदाचित अण्णा उपोषण मागे घेऊ शकतात. अण्णा हजारेंनी आपल्या कार्यकर्त्यांना आणि समर्थकांना विनंती केली आहे की, आंदोलनात कोणत्याही प्रकारची हिंसा होऊ नये. त्यांनी प्रजासत्ताकदिनी दिल्लीत झालेल्या हिसेंबाबत दु:ख व्यक्त केलं आहे. तसंच मी मेहमी अहिंसात्मक आणि शांतिपूर्ण आंदोलन इच्छितो असंही ते म्हणाले. गेल्या 40 वर्षात अनेकदा आंदोलनं केली. लोकपाल आंदोलनावेळी लोखोंच्या संख्येत लोक सामिल होत होते, परंतु कोणीही एक दगडही उचलला नाही. शांतता ही कोणत्याही आंदोलनाची सर्वात मोठी ताकद असल्याचं गांधींजींनी सांगितलं असल्याची आठवणही त्यांनी करून दिली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या