नवी दिल्ली, 16 एप्रिल : महिंद्रा ग्रुपचे (Mahindra & Mahindra) चेअरमन आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर (Anand Mahindra Twitter) एअर इंडियाच्या जुन्या सेवेचा फोटो शेअर केला असून जुन्या दिवसांच्या आठवणी जागवल्या आहेत. आता एअर इंडिया पुन्हा एकदा टाटा समूहाचा (Tata Group) भाग बनल्याने त्यांनी टाटा यांना तेव्हाची एक सेवा पुन्हा सुरू करण्याची विनंती केली आहे. Air Indiaचे हे लाउंज खास होते आनंद महिंद्रा यांनी शनिवारी एअर इंडियाच्या लाउंजचा फोटो ट्विट (Anand Mahindra Tweet) केला. हे चित्र 1949 मधील आहे, जेव्हा एअर इंडियाचे मुंबईच्या सांताक्रूझ विमानतळावर स्वतंत्र पॅसेंजर डिपार्चर लाउंज होते.
या फोटोसोबत त्यांनी लिहिलं आहे की, ‘तोही काळ होता, जेव्हा विमानाने प्रवास करणं हे गर्दीतून प्रवास करणं नसून शांततेत प्रवास करणं होतं. कदाचित टाटा समूह मुंबई विमानतळावरील या सुंदर लाउंजला पर्यटकांचं आकर्षण म्हणून पुनरुज्जीवित करेल. महिंद्रा यांच्या या ट्विटनंतर अनेकांनी मुंबईचे (तेव्हाचे बॉम्बे) जुने फोटो शेअर करण्यास सुरुवात केली. ट्विटर युजर Dr. Charuhas यांनी त्या काळातील चर्च गेटचा फोटो आणि आजच्या चर्च गेट स्टेशनचा फोटो शेअर केला आहे.
तर, आणखी एक युजर अॅलाइन डॉबी (Aline Dobbie) यांनी 1951 मध्ये एअर इंडियाच्या पहिल्या फ्लाइटबद्दल म्हणजे त्यांच्या पहिल्या विमान प्रवासाबद्दल लिहिलंय.
महिंद्रा यांच्या ट्विटमुळे अऩेकांच्या आठवणी ताज्या झाल्या.