JOIN US
मराठी बातम्या / देश / पैगंबरांबाबतच्या वक्तव्याचा वाद; अलकायदाची मुंबईसह या महत्त्वाच्या शहरांत आत्मघाती हल्ल्यांची धमकी

पैगंबरांबाबतच्या वक्तव्याचा वाद; अलकायदाची मुंबईसह या महत्त्वाच्या शहरांत आत्मघाती हल्ल्यांची धमकी

गुजरात, उत्तर प्रदेश, मुंबई आणि दिल्लीत आत्मघाती हल्ले करण्यासाठी तयार असल्याची अधिकृत धमकी दिली गेली आहे (al-qaeda Threatens Suicide Attacks). त्याचबरोबर भाजप लवकरच संपुष्टात येईल, असंही यात म्हटलं आहे

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 08 जून : अलकायदा या दहशतवादी संघटनेनं भारतात आत्मघाती हल्ले करण्याची धमकी दिली आहे. गुजरात, उत्तर प्रदेश, मुंबई आणि दिल्लीत आत्मघाती हल्ले करण्यासाठी तयार असल्याची अधिकृत धमकी दिली गेली आहे (al-qaeda Threatens Suicide Attacks). त्याचबरोबर भाजप लवकरच संपुष्टात येईल, असंही यात म्हटलं आहे. भाजप नेत्या नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांनी टीबीच्या चर्चेदरम्यान केलेल्या वक्तव्यामुळे अल कायदाने ही धमकी दिली आहे. या वादाचाही त्यांनी आपल्या संदेशात उल्लेख केला आहे. अलकायदाने म्हटलं की, काही दिवसांपूर्वी एका हिंदुत्व प्रचारकाने टीबीच्या चर्चेदरम्यान इस्लाम आणि प्रेषित मोहम्मद यांचा अपमान केला होता. त्यांच्या वक्तव्यामुळे जगभरातील मुस्लिमांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. अलकायदाने पुढे म्हटलं, ‘आम्ही पैगंबरांच्या अपमानाचा बदला घेऊ. आम्ही इतरांना या लढ्यात सहभागी होण्यास सांगू. पैगंबर मोहम्मद यांचा अपमान करणाऱ्यांना आम्ही मारून टाकू. आम्ही आमच्या शरीराला आणि आमच्या मुलांच्या शरीराला स्फोटके जोडू, जेणेकरून अशा लोकांना उडवता येईल.’ ­­­­राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक! सुरक्षा ताफ्यातीन दोन वाहने वाट चुकली अन्.. पैगंबर मुहम्मद यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांना आम्ही माफ करणार नाही. दिल्ली, मुंबई, उत्तर प्रदेश आणि गुजरातमधील भगव्या कार्यकर्त्यांना संपवणार. ते आपल्या घरात लपू शकणार नाहीत किंवा सुरक्षा दलही त्यांना वाचवू शकणार नाहीत. पैगंबर मोहम्मद यांच्यावरील वादग्रस्त वक्तव्याचा मुद्दा जोर धरत आहे. या प्रकरणात नुपूर शर्मांनीही आपल्याला धमक्या मिळाल्याचा आरोप केला आहे, या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी नुपूर शर्मांना सुरक्षा पुरवली आहे. 12 तासातली दुसरी चकमक, सुरक्षा दलाचं मोठं यश; लष्करच्या दोन दहशतवाद्यांना धाडलं यमसदनी नुपूर शर्मांनी दिल्ली पोलिसांकडे तक्रार केली की त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. यानंतर दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. आता दिल्ली पोलिसांनी नुपूर शर्मा आणि त्यांच्या कुटुंबाची सुरक्षा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. अरबस्तानातील अनेक इस्लामिक देशांनी भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांच्या पैगंबर मोहम्मद यांच्यावरील वादग्रस्त वक्तव्याचा निषेध केला आहे. भाजप प्रवक्त्यांच्या विधानावर आतापर्यंत 12 देशांनी आक्षेप घेतला आहे. ज्यामध्ये कतार, UAE, इराण, कुवैती, सौदी अरेबिया, जॉर्डन, बहरीन, ओमान, इंडोनेशिया, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि मालदीव यांचा समावेश आहे. भाजपकडूनही दोन्ही नेत्यांवर कारवाई करण्यात आली आहे. नुपूर शर्मांना पक्षाने निलंबित केलं आहे, याप्रकरणात नुपूर शर्मांनी माफीही मागितली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या