मुंबई, 18 फेब्रुवारी : चित्रपटांमधून राजकारणाकडे वळलेल्या शिवसेनेच्या नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी नरेंद्र मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. सध्या देशभरात कोरोनाबरोबरच पेट्रोल-डिजेलच्या वाढणाऱ्या किमतींबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. देशातील काही भागात पेट्रोलच्या किमती 100 रुपयांपर्यंत पोहोचल्या आहेत. अशातच उर्मिला मातोंडकर यांनी एका गाण्याच्या माध्यमातून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. उर्मिला मातोंडकर यांनी एक ट्वीट केलं आहे. या ट्वीटची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. अक्कड़ बक्कड़ बंबे बो डीजल नब्बे पेट्रोल सौ, असं ट्वीट उर्मिला मातोंडकर यांनी केलं आहे. या ट्वीटवर अनेकांना प्रतिक्रिया दिल्या आहेत. अभिनेत्री कंगना रणौत ही वारंवार भाजप समर्थनार्थ ट्वीट करीत आहे. कंगनाने अनेकदा आपल्या ट्वीटमधून शिवसेनेवर टीका केली आहे. दुसरीकडे उर्मिला मातोंडकर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर ट्वीटवर सक्रिय असल्याचे दिसून येत आहे.
हे ही वाचा-इंधन दरवाढीवर पंतप्रधान मोदींचा उपाय, भारताचं ओपेक देशांना उत्पादन वाढीचं आवाहन राजस्थान, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील काही भागात पेट्रोलचे दर 100 रुपयांपर्यंत पोहोचले आहे. पेट्रोलच्या किंमतींमध्ये होणारी वाढ दर्शविण्यासाठी उर्मिला यांनी गाण्याच्या ओळी वापरल्या आहेत.